पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 11:49 PM2019-05-10T23:49:45+5:302019-05-10T23:50:48+5:30

पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती.

 Transfers to 103 teachers of Palghar Zilla | पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

पालघर जि.प.च्या १०३ शिक्षकांच्या ठाण्यामध्ये बदल्या

Next

ठाणे  - पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे जानेवारीत बदली झालेल्या सुमारे १०३ प्राथमिक शिक्षकांची नेमणुक ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली नव्हती. मात्र, रखडलेल्या या बदल्या अखेर पालघर जिल्ह़ा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्या असून ते शिक्षक नेमून दिलेल्या शाळेत हजर झाले आहेत.

जिल्हा विभाजनानंतर दोन्ही जिल्ह्यात आकृतीबंधनुसार शिक्षकांची पदे समान ठेवण्याच्या निर्णय मागील वर्षी झाला. त्यास अनुसरून ठाणे जिल्ह्यातील काही शिक्षकांची पालघरमध्ये बदली करण्यात आली. मात्र, पालघर जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्यामुळे त्यावेळी शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने थांबवल्या होत्या. आता त्यांच्याकडे पुरेसे शिक्षक असल्यामुळे जिल्हा विभाजनानंतर आवडीच्या जिल्ह्यात राहणे पसंत करणाऱ्या विकल्पानुसार १०३ शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये १३८ शिक्षकांच्या बदल्या पालघर जिल्हा परिषदेने ठाणे जिल्ह्यात केल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे. परंतु, ते केवळ १०३ शिक्षक असून ते आधीच यायला पाहिजे होते ते आता हजर झाले आहेत. या पालघरच्या शिक्षकांना आता शहराजवळच्या शाळा मिळणार असल्याची चर्चादेखील जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आहे. मात्र, यास मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला नाही.

कारण आधीच ठाणे जिल्ह्यात सेवाज्येष्ठतेसह अन्य कारणाखाली काही शिक्षकांवर अन्याय झालेला असून तो दूर करावा, असे न्यायालयाने विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यानुसार १० मे रोजी विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांची सुनावणी होईल. त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार व तक्रारीस अनुसरून या शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात येईल असे सांगितले होते.

Web Title:  Transfers to 103 teachers of Palghar Zilla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.