जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात पर्यटक बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 20:39 IST2021-07-10T20:19:49+5:302021-07-10T20:39:00+5:30
- हुसेन मेमन जव्हार - जव्हार तालुक्यातील केळीचापाडा नाकेंदी डोहात कामोठे येथील आदर्श धर्मशंकर वय 45 या अति हौशी ...

जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात पर्यटक बुडाला
- हुसेन मेमन
जव्हार - जव्हार तालुक्यातील केळीचापाडा नाकेंदी डोहात कामोठे येथील आदर्श धर्मशंकर वय 45 या अति हौशी पर्यटकाचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.
पावसाळा सुरू होताच हौशी पर्यटक जव्हारच्या विविध पर्यटन स्थळावर गर्दी करतात, दरम्यान केळीचापाडा काळमांडवी धबधबा अतिशय विलोभनीय आहे, त्यामुळे बघ्यांची गर्दी असते. मात्र तेथे पर्यटक बंदी असल्यामुळे तेथीलच नाकेंदी डोहात पर्यटकांची रेलचेल असते.
असंच बदलापूर व कामोठे येथील तीन कुटुंब फिरण्यासाठी नाकेंदी डोहा जवळ गेले असता आदर्श धर्मशंकर नामक व्यक्तीचा पाय घसरला, पोहोता येत नसल्यामुळे पाण्यात बुडाला, स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्याला शवविच्छेदनासाठी जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.