आज टेटवाली ग्रा.पं.ची निवडणूक

By Admin | Updated: December 28, 2016 04:18 IST2016-12-28T04:18:44+5:302016-12-28T04:18:44+5:30

या तालुक्यातील टेटवाली ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या होते आहे. एकूण ७२४ मतदार असून ३ प्रभाग आणि ७ सदस्य संख्या आहे.

Today the election of G.P. | आज टेटवाली ग्रा.पं.ची निवडणूक

आज टेटवाली ग्रा.पं.ची निवडणूक

विक्रमगड : या तालुक्यातील टेटवाली ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या होते आहे. एकूण ७२४ मतदार असून ३ प्रभाग आणि ७ सदस्य संख्या आहे. या निवडणुकांसाठी एकुण १८ उमेदवार रिंगणात असून गेल्या महिनाभरापासून धडाडणा-या तोफा काल थंडावल्या़
यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे़ या ग्रामपंचायतीच्या ३ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५़ ३० या वेळेत मतदान होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ मतदान शांततेत पार पडावे यासाठी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरक्षणानुसार ४ प्रभाग महिलांसाठी तर ३ प्रभाग पुरुषांसाठी आहे. एकूण ७२४ मतदारात पुरुष-३५८ व स्त्रीया-३६६ आहेत़ निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस कर्मचारी,अधिकारी व राखीव दलाच्या तुकडया मिळून ३० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Today the election of G.P.