शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

कडेकोट अन कडकडीत...  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:12 AM

भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

पालघर : भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पालघर, बोईसर, विरार, नालासोपारा येथे आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरुन लोकल आडवल्याने त्या उशिराने धावत होत्या त्यातच जिल्हाभरात एसटीच्या १४८७ फेºया रद्द झाल्याने पालघर एसटी विभागाचे १८ लाख ७२ हजार ३०७ रु पयांचे नुकसान झाले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.राज्यात दिलेल्या बंदच्या हाकेनंतर जिल्ह्यातील भारतीय रिपिब्लकन पक्ष, रिपाई(अ), दलित पँथर, बंजारा टायगर्स, पालघर डहाणू बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध युवक संघ, दलित सेना आदी संघटनांनी बनविलेल्या बहुजन समाज अन्याय अत्याचार प्रतिकार समितीच्या वतीने जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे पालघर, डहाणू, तलासरी, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा व वसई तालुक्यात आंदोलकांमार्फत ठिकठिकाणी मोर्चे काढून अधिकार्यांना निवेदने देण्यात आली. तर पालघर मध्येही जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे ह्यांना रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष अहमद भिमानी, दलित पँथर प्रदेशाध्यक्ष अविष राऊत, सचिन लोखंडे, विनोद मोरे, नगरसेवक संजय गायकवाड, निलेश राऊत, राजेश गायकवाड आदींनी आपले निवेदन दिले. तर बोईसर पाचमार्ग, भीमनगर, जव्हार फाटा, जव्हार त्रंबकेश्वर रस्ता, मोखाडा खोडाळा रस्ता आंदोलनकर्त्यांनी रोखून धरल्याने या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती.सकाळी मुंबई येथे उमटलेले रेल रोकोचे पडसाद हळूहळू नालासोपारा, विरार येथे उमटून आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको केला तर दुपारी पालघर रेल्वे स्थानकात घुसलेल्या शेकडो आंदोलनकांनी १ वाजून २७ मिनिटांची लोकल काही मिनिटासाठी रोखून धरली. या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे रेलरोको मागे घेण्यात आले.जिल्ह्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया एसटीला या बंदाचा फटका बसला. पालघर विभागाअंतर्गत १९१ फेºया रद्द होऊन त्यांचे ३ लाख ३३ हजार १८५ रु पयाचे उत्पन्न बुडाले तर सफाळे विभागांतर्गत १५२ फेºया रद्द होऊन ९८ हजार ५४५ रु , वसई विभागांतर्गत २३८ फेºया रद्द होऊन २ लाख ५२ हजार ५९४ रु, अर्नाळा विभागांतर्गत २९८ फेºया रद्द होऊन ६ लाख ९२ हजार ५६३ रु, डहाणू विभागांतर्गत १५ फेºया रद्द होऊन ५७ हजार ५४२ रु, जव्हार विभागांतर्गत ३९ फेºया रद्द होऊन १ लाख ५ हजार ७४३ रु, बोईसर विभागांतर्गत ४८१ फेºया रद्द होऊन सर्वाधिक १ लाख ७५ हजार ४३ रु. तर नालासोपारा बस आगार विभागांतर्गत ७३ फेºया रद्द होऊन १ लाख ५० हजार ३१० रु पयाचा असा आठ आगार मिळून १ हजार ४८७ फेºया रद्द झाल्या असून त्याचा १८ लाख ७२ हजार ३०७ रु पयाचे उत्पन्नाला मुकावे लागल्याची माहिती विभागीय वाहतूक अधीक्षक आशिष चौधरी यांनी दिली.याचप्रमाणे आठही तालुक्यातील बोईसर, पालघर, वसई, वाडा येथील औद्योगिक क्षेत्राला याचा फटका बसून बुधवारी या आंदोलांकरत्यांमार्फत सर्व कारखाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने कारखानदारांनी आपल्या कामगारांना पुन्हा माघारी पाठवावे लागले. असे असले तरी या परिसरातील रिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे कामगारांना घरी जाण्यासाठी आठ ते दहा किमी पायपीट करावी लागली. तसेच, सकाळी मुंबई व इतर भागातून आलेले शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी व इतर कामगारांना आपल्या कार्यालयात जाण्यासाठी रिक्षा -एसटी नसल्याने पायी चालत जावे लागले.जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्रमुख बाजरपेठा, दुकाने, छोटे मोठे व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील बहुतांशी शाळा,महाविद्यालये सुरु असली तरी या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोचवणारी स्कुल बसेस व व्हॅन्स ही वाहने दुपार नंतर बंद करण्यात आल्याने पालकांना आपली वाहने घेऊन आपल्या मुलांना आणावे लागले.पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी, कर्मचाºयांच्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक पोलीस स्टेशन च्या अधिकाºयांना संवेदनशील क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरवण्याच्या सूचना देऊन जिल्ह्यात १०० होमगार्ड, शीघ्र कृती दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. ह्यावेळी पेट्रोलिंग ही चालू ठेवण्यात आल्याने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी सांगितले. संध्याकाळी ५ नंतर हळूहळू बाजारपेठा सुरु झाल्या.विरार आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनमध्ये लोकल रोखल्यावसई : भीमा कोरेगाव दुर्घनेटच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने वसई विरार परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी विरार आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको आंदोलन करण्यात आले. एसटी, परिवहन सेवा, रिक्शा दिवसभर बंद होत्या. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली होती. विशेष म्हणजे वसई विरार महापालिकेचे मुख्यालयही बंद होते. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर भीम सैनिक सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते. त्यांनी तालुक्यातील रिक्षा वाहतूक आणि बाजारपेठा सकाळीच बंद पाडल्या. त्यानंतर एसटी आणि महापालिकेची परिवहन सेवा बंद पाडली. सकाळी नऊच्या सुमारास विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात कार्यकर्ते ट्रॅकवर उतरले होते. दोन्ही ठिकाणी रेल रोको आंदोलन झाल्याने विरारहून चर्चगेटकडे जाणारी रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ट्रॅकवरून हटवल्यानंतर रेल्वे सेवा सुरु झाली होती. मात्र, संध्याकाळपर्यंत रेल्वे गाड्या उशिराने धावत होत्या. तर एरव्ही तुडूंब भरून धावणाºया गाड्यांमध्ये फारशी गर्दी नव्हती. प्लॅटफॉर्मवरही तुरळक गर्दी होती. रेल्वे, एसटी, परिवहन आणि रिक्शा वाहतूक बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत होऊन लोकांना त्रास सहन करावा लागला. कार्यकर्त्यांनी मोर्चा नेऊन महापालिकेचे विरार येथील मुख्यालय बंद पाडले. तसेच विभागीय कार्यालयेही बंद करण्यास भाग पाडले. कडकडीत बंद असल्याने शाळा-कॉलेजनाही सुट्टी देण्यात आली होती. विरारजवळील चंदनसार येथे तब्बल अर्धा दिवस रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नालासोपाºयातही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वसई विरारमध्ये कडकडीत बंद अगदी कोणताही अनुचित घटना न घडता पार पडला.कुडूसमध्ये रस्ता रोखला; लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्दवाडा : भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी वाडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी कुडूस नाका येथे भिमसैनिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तालुक्यातील वाडा शहर, कुडूस, खानिवली, कंचाड, शिरीषपाडा व आबिटघर या महत्वाच्या बाजारपेठेत बंद पाळण्यात आला. कूडूस नाका येथे सुमारे अर्धा तास भिमसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यावेळी भिमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.भिमा कोरेगांव घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा नेते स्वप्निल जाधव यांनी यावेळी दिला. शहरात भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर तिचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. या सभेला मार्गदर्शन करताना नेत्यांनी घटनेचा निषेध केला. भिमसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देऊन आपला संताप व्यक्त केला. यावेळी नगरसेवक रामचंद्र जाधव, मंदाताई कांबळे, वैभव पालवे, भरत थोरात, उपस्थित होते.तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरळीत सुरू होती. मात्र, लांबपल्याच्या गाड्या बंद असल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. अत्यावश्यक सेवा वगळता बंद कडकडीत पाळण्यात आला. पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दंगल पथकांच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती नाईक यांनी दिली. या आंदोलनात रिपिब्लकन नेते भेदभाव विसरुन एकत्र आले होते.बोईसरमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीतबोईसर : भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बोईसर सह परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवनविस्कळीत झाले होते तर तारापूर ते बोईसर या मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी ठीकठिकाणी केलेल्या रास्तारोकोमुळे वाहतूक काही वेळा करीता खोळंबली होती. बुधवारी सकाळपासून बोईसरची सर्व छोटी मोठी दुकाने, भाजी व मासळी बाजार, हॉटेल , बियर बार यांच्या सह तीन व सहा आसनी रिक्षा, एस टी बंद होत्या. या बंद मधून वागळलेली बोईसर परिसरातील मेडिकल स्टोर्स, रु ग्णालये, दवाखाने सुरळीत सुरू होते तर बहुतेक खाजगी शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आजच्या बंद मध्ये बहुजनांच्या विविध सामाजिक व राजकीय संघटना, पक्ष व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,भीमसैनिक व महिला मोठया प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.तारापूर , पाचमार्ग ,पास्थळ , भीमनगर ,पालघर रस्ता , बोईसर रेल्वे स्थानका समोरील रस्ता इत्यादी रस्त्यावर रास्ता रोको करून भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा निषेध करून संतप्त भावना व्यक्त केला तर शिवशक्ती प्रणति रिक्षा युनियन नेही बंद ला पाठिंबा दिला होता 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदVasai Virarवसई विरार