मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:36 IST2025-05-31T14:36:13+5:302025-05-31T14:36:35+5:30
Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
- हितेन नाईक
पालघर - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात ग्लोरिया वेल्स 73 वर्ष , क्लेटन वेल्स 43 वर्ष आणि फेबिओला वेल्स 45 वर्ष ह्या तिघांचा जागीच मृत्यू झाला.तर अन्य गाडीतील दोन प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गाचे 650 कोटीचे काम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे आणि अनेक त्रुटी ठेवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. ह्या तक्रारी करून ही ह्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर आजपर्यंत कुठली ही कारवाई झालेली नाही. त्या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे आजवर अनेक अपघात झाले असून निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे.