पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:52 IST2025-06-01T06:51:21+5:302025-06-01T06:52:09+5:30

अन्य दोनजण गंभीर जखमी झाले

Three of a family killed in accident in Palghar; Car crushed after being stuck between two trucks | पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाळा खडकोना गावाजवळ दोन ट्रकच्या मध्ये कार येऊन भीषण अपघात झाला. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा चक्काचूर झाला.

ग्लोरिया वेल्स (७३), क्लेटन वेल्स (४२) आणि फॅबिओला वेल्स (४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर हेनान वेल्स (६३) आणि रेडन वेल्स (९) हे दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेलसमोर एक कार पोहोचली असता, रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू असल्याने एक मार्गिका बंद होती. त्याचवेळी भरधाव कारसमोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे कारचालकाचे नियंत्रण सुटून ती ट्रकला धडकली, तर पाठीमागून आलेल्या ट्रकने कारला धडक दिली. दोन्ही वाहनांच्यामध्ये कार दाबली जाऊन कारचा चक्काचूर झाला. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पत्रा कापून लोकांना बाहेर काढले. 

Web Title: Three of a family killed in accident in Palghar; Car crushed after being stuck between two trucks