शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

तेरा लाखांचा अवैध मद्यसाठा जव्हारला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:07 AM

सूत्रधार सुरतमध्ये : जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर, पालघर अबकारी आणि पोलिसांची कामगिरी

हितेन नाईक।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह त्यांचा टेम्पो भाड्याने घेऊन त्यातून सिल्वासा येथून १३ लाख किमतीचा अवैध साठा नाशिककडे नेत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जव्हार येथे पकडला. या टेम्पोत जीपीआरएस सिस्टम लावून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार या टेम्पोवर सुरत येथून मोबाइलच्या साहाय्याने नियंत्रण ठेवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली.

जव्हार - नाशिक मार्गावर टोमॅटोच्या टेम्पोमधून अवैध मद्यसाठा सिल्वासा येथून नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री हा टेम्पो सिल्वासामधून नाशिककडे जात असताना जव्हार येथे थांबविण्यात आला. टेम्पो चालकाने मागचा फालका उघडला असता सर्वत्र टॅमोटोने भरलेले प्लास्टिकचे क्रेट रचलेले होते. अधिकाऱ्यांनी एका मागोमाग रचलेले दोन थर काढल्यानंतरही टॅमोटोचे क्रेट निघत असल्याचे पाहिल्यावर आपल्याला मिळालेली टीप चुकीची असल्याचा संशय कर्मचाºयांनी व्यक्त केला. मात्र आपल्याला टीप देणारा खबºया विश्वासू असल्याने सुभाष जाधव यांनी सर्व क्रेट खाली करायला लावले आणि त्यांचा संशय खरा ठरत मागच्या दोन्ही रांगेत विदेशी मद्याचे १२० बॉक्स मोठ्या हुशारीने लपवून ठेवल्याचे दिसून आले.

हा टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर तो पालघरच्या अधीक्षक कार्यालयात घेऊन जाण्यासाठी तो सुरू करून वळण घेतल्याबरोबर टेम्पो बंद पडला. तो सुरूच होत नसल्याने मॅकॅनिकला बोलावण्यात आल्यानंतर अनेक प्रयत्न सुरू करूनही तो सुरू होत नव्हता. मेकॅनिकने स्टेअरिंगच्या खालचा कप्पा उघडला असता त्यात जीपीएस सिस्टिम लावण्यात आल्याचे दिसले. टेम्पोने आपला मार्ग बदलल्याचे ही सिस्टीम चालविणाºयाला कळल्यानंतर त्याने टेम्पो बंद केला. याबाबत माहिती घेतल्यावर या प्रकरणाचा सूत्रधार मनिषभाई राजपूत हा सुरतमध्ये बसून ही अद्ययावत यंत्रणा चालवित असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याशी संपर्क साधण्यात पो.नि.जाधव यशस्वी ठरले. या संपूर्ण गाडीचे कंट्रोल सुरतमध्ये बसून राजपूत चालवीत असून सिल्वासावरून माल भरलेली गाडी चालकाच्या हातात दिल्यानंतर नाशिक हायवे वरील एका ठिकाणावर टेम्पो पोचल्यावर राजपूत अन्य दुसºया चालकाच्या ताब्यात हा टेम्पो देऊन त्यांनी निघून जायचे, अशी खेळी खेळली जात होती.शेतकºयांची होते फसवणूकया अवैध मद्यसाठ्याच्या प्रकारात आरोपी राजपूत यांनी नाशिक (सावर पाडा) येथील नरेंद्र पवार या शेतकºयांचा टेम्पो करार करून भाड्याने घेतला होता. भाजीपाला विक्र ीच्या नावाखाली सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणात मद्यसाठा भरून तो नाशिक व अन्यत्र भागात लेबल बदलून विक्री केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. नाशिकवरून भाजीपाला भरून दररोज शेकडो टेम्पो पालघर, ठाणे, सुरत आदी भागात जात असतात. या टेम्पोची तपासणी शक्यतो पोलीस करीत नसल्याने मुख्य आरोपीने ही शक्कल लढविल्याची माहिती जाधव यांनी दिली. जप्त केलेल्या १२० बॉक्सची किंमत एकूण १३ लाख असून हा अवैध मद्यसाठा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले असून या प्रकरणी प्रदीप कुमावत आणि विक्रमसिंग रा.सुरत यांना अटक केली आहे. या कारवाईत निरीक्षक जाधव, दुय्यम निरीक्षक श्रीपाद मिसाळ, रामदास काटकर, शिपाई राठोड, पवार, कराड आदिंनी सहभाग घेतला.