डोक्यात दगड घालून खून, पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 06:23 IST2018-11-11T06:23:27+5:302018-11-11T06:23:42+5:30

वरप आणि कांबादरम्यान असलेल्या एका फार्म हाउसमध्ये पाडव्याच्या दिवशी ही घटना घडली.

There is a doubt that the incident took place in a stone, a pre-emptive incident | डोक्यात दगड घालून खून, पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा संशय

डोक्यात दगड घालून खून, पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा संशय

टिटवाळा/ म्हारळ : पूर्ववैमनस्यातून कल्याण तालुक्यातील पावशे पाडा येथील भालचंद्र पावशे (३५) यांचा डोक्यात दगड घालून गुरुवारी सायंकाळी खून करण्यात आला. या प्रकरणी सागर पावशे (३४) याला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण न्यायालयाने शुक्रवारी त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

वरप आणि कांबादरम्यान असलेल्या एका फार्म हाउसमध्ये पाडव्याच्या दिवशी ही घटना घडली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, टिटवाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक केशव नाईक यांनी धाव घेतली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Web Title: There is a doubt that the incident took place in a stone, a pre-emptive incident