शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पदोन्नती न मिळालेल्या शिक्षकांचे होणार नुकसान, सहा वर्षांपासून प्रक्रिया रखडल्याने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 1:39 AM

मागील सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे.

वसई  - ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण नसणे आणि शिक्षकांच्या विकल्प बदल्या आदी कारणास्तव मागील सहा वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या विविध पदांची पदोन्नती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. दरम्यान, याबाबत वसई तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेने वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, त्यांना यात लक्ष घालण्यासाठी साकडे  घातले आहे. जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने या संदर्भात दि. ४ डिसेंबर रोजी शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांची भेट घेतली होती. बिंदू नामावली प्रक्रिया लवकरच अद्ययावत करण्यासाठी शिक्षण विभागाला डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी अतिरिक्त मु.का. अधिकारी वाघमारेही उपस्थित होते. परंतु त्याला ४ महिने होऊन गेले, तरी ते काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने, त्याचा फटका एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना बसणार आहे. पालघरमधील शिक्षकांनाच हा फटका बसणार आहे. कारण ठाणे आणि अन्य ठिकाणच्या शिक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. यासंदर्भात रविवारी आ. हितेंद्र ठाकूर यांनी शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी दूरध्वनीवरून विचारणा केली.  

हितेंद्र ठाकूरांना साकडे शिक्षकांची माहिती अपूर्ण असून, ती घेण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी लता सानप यांनी सांगितले. यावर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मोहन पाटील, अध्यक्ष मॅन्युअल डाबरे, सरचिटणीस प्रकाश उबाळे, रवींद्र घरत, डेनिस जोसेफ, हेमांगी राऊत, वंदना पाटील यांचा समावेश होता. 

टॅग्स :Teacherशिक्षक