शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

झेंडावंदन करणाऱ्या श्रमजीवींना चोपले

By admin | Updated: January 28, 2017 02:31 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आदिवासी श्रमजीवींना झेंडावंदनाचा हक्क नाकारण्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. माजी आमदार

वाडा : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच आदिवासी श्रमजीवींना झेंडावंदनाचा हक्क नाकारण्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चापूर्वी सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फडकलेल्या झेंड्याला वंदन करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न हाणून पाडत नाशिक पोलिसांनी विवेक पंडित यांच्यासह शेकडो आंदोलकांना अटक केली. या वेळी पुरुष पोलिसांनी महिला आंदोलकांना अक्षरश: फरफटत नेऊन अटक केल्याचा आरोप करण्यात आला. मेजर रामराव लोंढे या माजी सैनिकाच्या न्याय्य हक्कासाठी या मोर्चाचे आयोजन केले होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धात गोळ्या झेललेले त्र्यंबकेश्वर येथे राहणारे माजी सैनिक मेजर रामराव लोंढे यांचे घर त्र्यंबक नगर परिषदेने जमीनदोस्त केले. मेजर लोंढे यांनी सैन्यातून परतल्यावर सरकारकडून ११ हजार रुपयांना जमीन विकत घेतली होती. या जमिनीत त्यांनी सरकारी परवानगी प्रक्रिया पूर्ण करत घर बांधले होते. त्यानंतर, नगर परिषदेच्या नाहरकत परवानग्या घेऊन त्या ठिकाणी माजी सैनिकांचे कार्यालय सुरू केले. सिंहस्थ कुंभ मेळाव्याचे कारण पुढे करत शाही मार्गावर नसलेले हे बांधकाम राजकीय आकसापोटी प्रशासनाने तोडले. विशेष म्हणजे त्यांच्याशेजारी असलेले नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे अतिक्र मण मात्र पूर्णपणे दुर्लक्षित केले. याबाबत जाब विचारण्यासाठी पंडित यांनी स्वत: नाशिकमध्ये येऊन संघर्ष केला. यानंतर आठ दिवस आधी निवेदन देऊन २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याची पूर्वकल्पना प्रशासनाला दिली होती. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विवेक पंडित यांना २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भेटण्याचे कबूल केले होते. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता जेव्हा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले आणि तेथील राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचा आपला सांविधानिक हक्क बजावू लागले, तेव्हा येथील पोलिसांनी आंदोलकांना अडवले. (वार्ताहर)