कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:34 AM2019-08-14T00:34:51+5:302019-08-14T00:35:04+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या.

Suspend to Kavale Ashram school superintendent, demands Tribal Development Council | कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

कावळे आश्रमशाळा अधीक्षिकेला निलंबित करा, आदिवासी विकास परिषदेची मागणी

googlenewsNext

जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत कावळे शासकीय आश्रमशाळा, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बारावीत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनी अधिक्षिकेच्या अमानवी जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटण्यास गेल्या. मात्र, बकरी ईदची सुट्टी असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. यावेळेस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, पालघर जिल्ह्याचे जव्हार तालुका उपाध्यक्ष महेश घेगड यांनी त्यांची समस्या जाणून घेतली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संघटनेने मंगळवारी सकाळी कार्यालयात ठिय्या मांडून अधीक्षक बाईला निलंबित करा अशी मागणी केली आहे.

या आश्रमशाळेत सध्या अधीक्षिका बार्इंची मनमानी सुरू असल्याचे मुलींचे म्हणणे आहे. कपडे सुकण्यासाठी मुलींना दोरी बांधू न देणे, एकच कपडा सहा/सात दिवस वापरणे, सुटीच्या दिवशी देखील शाळेचा गणवेश घालावयास लावणे, कपडे सुकत टाकल्यास त्यांच्याकडून दंड घेणे तसेच त्यांना ५० ते १०० दंड बैठक काढायला सांगणे. शिक्षा म्हणून शौचालय साफ करणे, शाळा साफ करणे अशी शिक्षा केली जात असल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले. तसेच शिक्षा म्हणून त्यांचे कपडे धुणे, भांडी घासणे अशी शिक्षा देखील देत असल्याचे त्या मुली सांगतात. पाणी नसल्यास इमारतीच्या खाली जाऊ न देणे, विना आंघोळ ठेवणे अशी अमानवी वागणूक या मुलींना मिळते.

मुलींना एकमेकांच्या रूमकडे जाऊ न देणे, तसेच घरी जाण्यासाठी सुटी मागितल्यावर पहिल्यांदा वर्ग शिक्षकांची सही आणायला लावून मगच सुटी दिली जाते, असे या मुलींचे म्हणणे आहे. मात्र, शनिवारी शाळा सुटली की वर्गशिक्षक लगेच घरी जातात, मग सही आणू न शकल्याने आाम्हाला सुटी मिळत नाही. आमच्या शाळेत दोन गट केले आहेत. आम्हाला वेगळा न्याय दिला जातो आणि ज्या मुली अधीक्षिका बार्इंचे सगळे काम करतात त्यांना शिक्षा न करणे अशी वागणूक देतात. त्यामुळे आम्ही जाचाला कंटाळून प्रकल्प अधिकाºयांची भेट घेण्यासाठी आलो. आणि संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत अधीक्षिका मॅडमची बदली होत नाही तोवर एकही मुलगी शाळेत जाणार नाही असेही या मुलींनी सांगितले.

त्या मुली, चप्पल पायात न घालता आणि छत्री न घेता ऐन पावसाच्या दिवशी जव्हारला आल्या होत्या. एवढ्या वेदना दिल्या जातात की आज त्यांना हे पाऊल उचलावे लागत आहे. आम्ही त्यांच्या जिद्दीला दाद देतो. आमच्या आदिवासी मुलींनी किती अन्याय सहन करायचा, त्या अधीक्षिकेला जव्हार प्रकल्पातून हाकलून देऊन त्यांची बदली दुसरीकडे करावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.
- दशरथ महाले, सचिव वाडा

आदिवासी बहिणींना अशी अमानवी वागणूक देणाºया त्या अधिक्षिका यांची बदली करण्यात यावी यासाठी प्रकल्प अधिकारी यांना भेटणार आहोत.
- लहू नडगे,
तालुकाध्यक्ष
विक्र मगड

Web Title: Suspend to Kavale Ashram school superintendent, demands Tribal Development Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.