वसईतील भुईगाव समुद्रात संशयित बोट आढळली; पोलिसांसह नौदल सतर्क, तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 21:04 IST2021-09-02T21:03:17+5:302021-09-02T21:04:46+5:30
Suspicious Boat Found in Vasai : भुईगावच्या समुद्र किनारी खडकाळात एक संशयित अडकलेली बोट स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सापडल्यावर वसई पोलिसांना माहिती देण्यात आली.

वसईतील भुईगाव समुद्रात संशयित बोट आढळली; पोलिसांसह नौदल सतर्क, तपास सुरु
वसईच्या भुईगाव समुद्रात एका ठिकाणी खडकात स्थिर बोट आढळल्याने या बोटीबद्दल संशय निर्माण झाला असून याबाबत तटरक्षक दलाला पोलिसांनी कळविण्यात आले आहे. या समुद्र किनारी वसई पोलिसांनी धाव घेतली आहे.
भुईगावच्या समुद्र किनारी खडकाळात एक संशयित अडकलेली बोट स्थानिकांना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सापडल्यावर वसई पोलिसांना माहिती देण्यात आली. वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी अधिकारी व फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त लावला आहे. समुद्रात आतमध्ये बोट असून मध्यम स्वरूपाची असून याला एक कॅबिन असल्याची माहिती कर्पे यांनी लोकमतला दिली. तर भुईगाव बीच परिसरात बोट सापडली आहे.
तटरक्षक दलाला याबाबत माहिती दिली असून त्यांनी हवाई निगराणीद्वारे तपासणी केली आहे. बोटीवर पोहोचणे कठीण असून तरीही बोट किंवा मालकाची ओळख झालेली नाही असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतला सांगितले. बोट भरसमुद्रात आहे, हेलिकॉप्टरची एक फेरी जाऊन आली आहे, नौदल, मेरी टाईम बोर्ड, कस्टम अधिकारी, कोस्ट गार्ड आणि वसई पोलीस तपास करीत आहेत.