surya dam water supply pipeline bursts near mumbai ahmedabad highway | वसई-विरारला पाणी पुरवठा करणारी सूर्याची जलवाहिनी फुटली!, दुरुस्तीला २४ तास लागणार

वसई-विरारला पाणी पुरवठा करणारी सूर्याची जलवाहिनी फुटली!, दुरुस्तीला २४ तास लागणार

वसई- विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणारी सूर्या धरणाची ११०० मि.मी व्यासाची जलवाहिनी मंगळवार (दि.23 ) रोजी सकाळी ९ वाजता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड फाटा पुलाजवळ फुटली असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.या बाबतीत अधिक माहिती देताना या जलवाहिनी च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या नादुरुस्त फुटलेल्या जलवाहिनी च्या दुरुस्तीसाठी पुढील २४ तास लागणार असल्याची माहिती देखील वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकानी लोकमतला दिली. दरम्यान या जलवाहिनीच्या दुरुस्ती व पाणीपुरवठा बाबतीत बोलताना पालिकेने या जलवाहिनी मधून होणारा पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने  चालू न ठेवता तो साधरण 50% कमी दाबाने चालू राहणार आहे. तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होई पर्यंत वसई -विरारकरांना बुधवारी पाणीपुरवठा हा कमी दाबाने चालू राहील.

किबहुना याच्या दुरुस्तीवेळी काही तांत्रिक  अडचण निर्माण झाल्यास जलवाहिनी मधून होणारा पाणीपुरवठा पूर्ण पणे बंद करायला ही लागू शकतो असे ही महापालिका पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं आहे. परिणामी असे झाल्यास वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा 24 तासासाठी अनियमित आणि कमी दाबाने चालू राहील, तरी वसईतील नागरिकांनी वसई विरार शहर महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: surya dam water supply pipeline bursts near mumbai ahmedabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.