सूर्याचे काम पोलिस बंदोबस्तात; मनोरकर संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:03 PM2018-12-10T23:03:39+5:302018-12-10T23:04:39+5:30

बंद पाडलेले खोदकाम पुन्हा सुरू, जमिनीची भरपाई अजून नाहीच

The sun work is in the police station; Manorful | सूर्याचे काम पोलिस बंदोबस्तात; मनोरकर संतापले

सूर्याचे काम पोलिस बंदोबस्तात; मनोरकर संतापले

- आरिफ पटेल 

मनोर : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास पालघर जिल्हासह हालोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध असतांनाही एम एम आर डी ए ने सर्व नियम धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात सोमवारी काम सुरू केले. या रूपाने त्यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त शेतकरी व या योजनेच्या विरोधात लढणाºया संघटना तीव्र तीव्र संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

या आधी एमएमआरडीए ने पोलीस बंदोबस्तात जल वाहिनी टाकण्याच्या कामास सुरु वात करताच संतप्त शेतकºयांनी आक्रमक होऊन काळे झेंडे घेऊन, घोषणा देत काम बंद पाडल होते. तसेच खोदकामासाठी आणलेले पोकलेन मशीन माघारी घेणे एमएमआरडीए च्या अधिकाºयांना भाग पाडले होते.

राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेली आहे त्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही आणि आता त्या जमीनीमध्ये पाईप लाईन टाकण्याचे काम गैरप्रकारे होत आहे. कारण शेतकºयांची जमिनी मुंबई अहमदाबाद महामार्गासाठी संपादीत करण्यात आली होती. कायद्यानुसार ती संपादीत जमीन एकच कारणासाठी आहे परंतु त्या जमिनीचा ५ जून २०१३ ला गाव निहाय निवडा झाला होता त्या वेळी त्या मध्ये पान क्रमांक १६ मधील निवाडा पाहता संपादीत होत असलेली जमीन एकच प्रयोजनासाठी संपादीत होत आहे असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
परंतु त्या रस्त्याच्या बाजूला वनपट्टेधारक, शेतजमीनधारक, व वनजमीनचा समावेश आहे. शेकडो शेतकºयांना रस्त्या मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. वन विभागाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही तरी त्यांचे अधिकारी झोपेत आहेत.
अविनाश पाटील हे सामाजिक कार्यकर्ता म्हणाले की ढेकाळे ते दुर्वेस पर्यंत शेकडो शेतकºयांची जमीन रस्त्या मध्ये गेल्या आहेत त्याचा मोबदला दिला नाही अणि आता त्या जमिनीत सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाईन चे काम सुरू केले आहे. गोर गरीब शेतकºयांना पोलिसांचा धाक दाखवून बळजबरी सुरू आहे. जमिनीचा मोबदला मिळत नाही तो पर्यंत आम्ही संघर्ष करीत राहू आता तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

महामार्गाच्या आर. ओ. डब्ल्यू. मधून सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी एमएमआरडीएला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडे
प्रयत्न करू.
-कुणाल शेंडे,
अभियंता, एमएमआरडीए

Web Title: The sun work is in the police station; Manorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.