10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 10:38 IST2021-11-23T10:35:47+5:302021-11-23T10:38:08+5:30

जव्हार तालुक्यातील विनवळ पैकी ढाकपाड येथील मोनिका धाकलू मोरघा (वय 15) या अल्पवयीन मुलीने सोमवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

Suicide of a student of 10th standard Ashram School in jawhar | 10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

10 वीत शिकणाऱ्या आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

ठळक मुद्देआदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय, जव्हार अंतर्गत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक अंतर्गत ही आश्रमशाळा चालविण्यात येत आहे. 

पालघर - जव्हार तालुकयातील विनवळ येथे इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. या मुलीने ढाकपाड येथे सोमवारी सायंकाळी गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय, जव्हार अंतर्गत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक अंतर्गत ही आश्रमशाळा चालविण्यात येत आहे. 

जव्हार तालुक्यातील विनवळ ढाकपाड येथील मोनिका धाकलू मोरघा (वय 15) या अल्पवयीन मुलीने सोमवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मोनिका ही अनिवासी विद्यार्थी होती, ती दररोज शाळेत येऊन जाऊन शिक्षण घेत होती. शनिवार 20 नोव्हेंबर रोजी ती नियमित शाळेत गेली होती, रविवारी सुट्टी होती. पण, सोमवारी ती शाळेत गेलीच नाही. ती घरीच होती, तिने घरी कोणीही नसतांना सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आश्रमशाळेत खबर देण्यात आली, अशी माहिती प्रकल्प कार्यलयाकडून मिळाली. मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही, तिच्यावर मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालय, जव्हार येथे शवविच्छेदन करण्यात आले असून, जव्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide of a student of 10th standard Ashram School in jawhar