खारबाव सरपंच यांच्या उपोषण आंदोलनाला यश; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 04:38 PM2021-10-09T16:38:00+5:302021-10-09T16:38:10+5:30

खारबाव सरपंचांच्या उपोषण आंदोलनाला यश ; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद , अश्वासनांनंतर उपोषण घेतले मागे  - ...

Success of Kharbaw Sarpanch's fast; Toll Naka on Chinchoti Mankoli Highway closed | खारबाव सरपंच यांच्या उपोषण आंदोलनाला यश; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद

खारबाव सरपंच यांच्या उपोषण आंदोलनाला यश; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद

Next

खारबाव सरपंचांच्या उपोषण आंदोलनाला यश ; चिंचोटी मानकोली महामार्गावरील टोल नाका झाला बंद , अश्वासनांनंतर उपोषण घेतले मागे 

- नितिन पंडीत 

भिवंडी- भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे.  या रस्त्याकडे टोल कंपणीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून या रस्त्यावरील मालोडी टोल नाक्यावर उपोषणासाठी बसले होते. तब्बल तीन दिवसानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रा कंपनीने सरपंच महेंद्र पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असून शनिवार पासून टोल वसुली देखील बंद करण्यात आली असल्याचे लेखी स्पष्ट केल्या नंतर महेंद्र पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, तालुकाध्यक्ष गणेश गुळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत महेंद्र पाटील यांनी आपले उपोषण शनिवारी दुपारी मागे घेतले.

चिंचोटी मानकोली रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या सुप्रीम कंपनीबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे या रस्त्यावर पुरता दुर्लक्ष होत आहे . या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून रस्ता प्रचंड नादुरुस्त झाला आहे . मात्र या रस्त्यावर सुप्रीम कंपनीमार्फत मालोडी येथील टोल नाका राजरोसपणे सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह शासनाचे या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष जावे व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा या मागणीसाठी खारबाव ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्यावर आमरण उपोषणास बसले होते. या आंदोलनात महेंद्र पाटील यांच्या सोबत खारबाव  ग्राम पंचायतीचे एकूण १३ सदस्य तसेच जिल्ह्या परिषद सदस्य रत्ना तांबडे , राष्ट्रवादीच्या सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष व जैष्ठ कार्यकर्ते कमलाकर टावरे , मालोडीचे उपसरपंच विशाल पाटील , प्रवीण पाटील , प्रशांत म्हात्रे आदी कार्यकर्त्यांसह साईस गृपचे तरुण कार्यकर्ते देखील य उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.

सुप्रीम कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या रस्त्याबाबत दुर्लक्षित धोरणामुळे या रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खारबावचे सरपंच महेंद्र पाटील हे गुरुवकार पासून उपोषणास बसले होते. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद करावा , काँक्रेटकरणाचे व दुरुस्तीचे काम उच्च दर्जाचे असावे, रस्त्याची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत या व अशा मागण्यांसाठी सरपंच पाटील हे गुरुवार पासून मालोडी टोल नाक्याच्या बाजूलाच उपोषणाला बसले आहेत. अखेर सुप्रीम कंपनी पाटील यांच्या आंदोलनापुढे नमली असून शनिवारी टोल नाका बंद करत हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद ठेवावे लागेल जर टोल नाका रस्ता दुरुस्ती आधी सुरु केला तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेंद्र पाटील यांनी टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीला दिला आहे. 

Web Title: Success of Kharbaw Sarpanch's fast; Toll Naka on Chinchoti Mankoli Highway closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app