शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची मरणयातना; घोटभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून तंगडतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 07:13 IST

आदिवासी भोगताहेत मरणयातना

रवींद्र साळवेमोखाडा  : डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय, तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय, असा दावा करतेय. पण  पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांचा रस्ता मात्र या ‘विकास’ महाशयांना सापडतच नाहीये. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या पाड्यांना  पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पालघरमधील सावरखूट पाड्यावरील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी दोन किमीचा डोंगर करावा लागत आहे. 

अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठी तरतूद केली जाते, पण  विकास   दिसत नाही. मुंबई  पासून १०० किमी अंतरावर तर शहापूरपासून ३५ ते ४० अंतरावर अजनूप दापूर ग्रामपंचायतीच्या  हद्दीत १७ घरे व १०० लोकवस्तीचा  ठाणे  व  पालघरच्या सीमेवर  मोखाडा तालुक्यालगत डोंगरात   वसलेला  सावरखूटपाडा हा सोयीसुविधांअभावी  मरणयातना भोगत  आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणालगत सावरखुटपाडा वसलेला आहे.  धो-धो पाणी वाहून जात असताना या आदिवासींना पाणी मिळत नाही. रणरणत्या उन्हात अनवाणी दोन किमीचा  डोंगर  तुडवत वृद्ध महिला, मुलांना पाणी आणावे लागत आहे, परंतु याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत  आहे. 

पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढणार?n राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणीदेखील वाढली आहे. n पाणीटंचाईवर उपाय म्हणून पाणीपुरवठा विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो. n यंदाही शहापूर तालुक्यात २६ पाण्याच्या टँकरद्वारे १२६ गावपाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. n येत्या काही दिवसात पाणीटंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या तिपटीने वाढ होणार आहे.

आमचं पाणी लय लांब, पाणी आणायला दोन तास लागतात, डोंगरातून पाणी घरी घेऊन जाताना अक्षरशः आत्महत्या करावीशी वाटते.- यशोदा  वारे, वृद्ध महिला, सावरखूटपाडा

ठक्करबाप्पा योजनेच्या  माध्यमातून तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून सावरखूटपाड्याचा पाण्याचा  प्रश्न व रस्त्याचा  प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत,  परंतु चारही  बाजूने  वनविभागाची जमीन  असल्याने  अडचणी येत  आहेत. तरीदेखील आम्ही  या पाड्याची समस्या सोडवण्याकाठी प्रयत्नशील आहोत. - दौलत दरोडा, आमदार

टॅग्स :Waterपाणीpalgharपालघर