शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या एलआयसी कार्यालयात चोरीचा प्रयत्न

By admin | Updated: January 7, 2016 00:22 IST

पूर्वेकडील छत्रपती शिवाजी मार्गावर असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शाखा क्र. ९२एल मध्ये शनिवारी (२ जानेवारी) रोजी चोरीचा

भार्इंदर : पूर्वेकडील छत्रपती शिवाजी मार्गावर असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शाखा क्र. ९२एल मध्ये शनिवारी (२ जानेवारी) रोजी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचे उजेडात आले आहे. गतवर्षीही याच शाखेतून सुमारे सव्वादोन लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती.एलआयसीने आठ वर्षांपूर्वी भार्इंदर पूर्वेकडील जेसल पार्क येथील शाखा बंद करुन ती मीरा-भार्इंदर रोडवरील ओल्ड गोल्डन नेस्ट समोरील हिमालय कॉम्प्लेक्स इमारतीत सुरु केली आहे. मीरारोड येथील सॅटेलाईट सेंटर वगळता भार्इंदर येथे एलआयसीची एकमेव शाखा असल्याने येथील आयुर्विमाधारक याच शाखेत आपला विम्याचा हप्ता भरतात. दररोज लाखोंचा व्यवहार होत असलेल्या या शाखेत एलआयसीने कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतलेली नाही. या शाखेत जमा होणारी रक्कम दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यालयात जमा करण्यात येत असल्याने कलेक्शनच्या दिवशी ती अधिकाऱ्यांच्या सेफ्टी ड्रॉव्हरमध्ये ठेवली जाते. यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी ८ जानेवारी २०१५ रोजी मध्यरात्री कार्यालयाचे शटर तोडून सुमारे सव्वादोन लाखांची रोकड लांबविली होती.या चोरीनंतरही एलआयसी प्रशासनाने कोणतेही सुरक्षिततेचे उपाय योजले नसल्याने यावर्षी २ जानेवारीला पुन्हा अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ही बाब रविवारी (३ जानेवारीला) सुट्टीच्या दिवशी अत्यावश्यक कार्यालयीन काम निघाल्याने कार्यालयात आलेले अधिकारी गिरकर यांच्या निदर्शनास आली. (प्रतिनिधी)