शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

वसईतील एसटीची शालेय बससेवा सुरू, विद्यार्थ्यांना पासचेही वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:02 AM

पहाटे शेकडो विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागल्यानंतर वसईत प्रचंड उसळलेला संताप लक्षात घेऊन एसटीने शालेय बससेवा पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासही देणे सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : पहाटे शेकडो विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागल्यानंतर वसईत प्रचंड उसळलेला संताप लक्षात घेऊन एसटीने शालेय बससेवा पुन्हा सुरु करून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासही देणे सुरु केले आहे.एसटी महामंडळाने ६ डिसेंबरपासून शहरी मार्गावरील बससेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांना बसला होता. एसटीनुसार वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेने पहाटेची शालेय बस न सोडल्याने वसईच्या पश्चिम पट्ट्यातील शेकडो विद्यार्थ्यांन कडाक्याच्या थंडीत कुÞडकुडत तब्बल दीड तास रस्त्यावर उभे रहावे लागले होते. त्यानंतरही बस न आल्याने विद्यार्थ्यांना एक दिवस शाळा आणि कॉलेजला मुकावे लागले होते. दुसरीकडे, एसटीनुसार पहाटेच्या पहिल्या लोकलपासून ते शेवटच्या लोकलपर्यंत बस सेवा देण्यास परिवहन सेवा अपयशी ठरली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचेही हाल होऊ लागले आहेत.याचे तीव्र पडसाद वसईच्या ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. जनआंदोलन समितीने विद्यार्थी आणि प्रवाशांना सोबत घेऊन शनिवारपासून आंदोलनाची तयारी केली होती. मात्र, एसटी आणि परिवहन विभागाने सुरळीत बस सेवा देऊ, असे आश्वासन प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना दिल्यानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.सध्या एसटी शालेय बस सेवा सुरु ठेवणार असून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील पासही देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.आता महापालिका एसटीविरोधात याचिकाहायकोर्टाच्या निर्देशानुसार वसईत एसटी आणि परिवहनने बस सेवा देणे बंधनकारक आहे. असे असताना एसटीने बस सेवा बंद करून हायकोर्टाचा अवमान केला आहे. तर परिवहन सेवेचा कारभार बिनभरोसे आहे. त्यामुळे हायकोर्टाचा अवमान केल्याची याचिका एसटी आणि महापालिकेविरोधात दाखल करणार आहोत, अशी माहिती याचिकाकर्त्या डॉमणिका डाबरे यांनी दिली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ