शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

डम्पिंगमुक्त अंबरनाथकरिता स्पेनची कंपनी सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:49 PM

पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया : खासदार, नगराध्यक्षांनी केली पाहणी

अंबरनाथ : शहरी नागरी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्पेनमधील लेबलान या कंपनीने अंबरनाथ शहरात कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. या कंपनीच्या आमंत्रणावरून कल्याणचे खा.डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथचे नगराध्यक्ष यांनी स्पेनमधील लॉग्रोनो शहरातील घनकचरा प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पासारखाच प्रकल्प अंबरनाथमध्ये उभारण्याचा विचार सुरू आहे.

सहा महिन्यांपूर्वी स्पेनच्या लेबलान या कंपनीचे एक पथक अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी आले होते. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडलाही भेट दिली होती. यावेळी डम्पिंगची समस्या आणि दुर्गंधी यावर उपाययोजना आखणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कंपनीने अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्रकल्प राबविण्यास अनुकूलता दर्शवली. अंबरनाथ पालिकेलाही कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी कंपनीची गरज होती. त्यामुळे स्पेनच्या कंपनीच्या प्रस्तावावर विचार सुरू झाला आहे. या स्पेनच्या कंपनीने प्रकल्प पाहण्यासाठी खा.डॉ. शिंदे, अंबरनाथ पालिकेतील अधिकारी आणि नगराध्यक्षांना स्पेनचे आमंत्रणही दिले होते. त्यानुसार, खा. शिंदे, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांनी स्पेनचा दौरा केला. स्पेनमधील प्रकल्पात एका दिवशी ५०० टन कचºयावर प्रक्रिया केली जाते. ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचºयापासून कम्पोस्ट तयार करण्यात येते. या प्रकल्पात डम्पिंग ग्राउंड कोठेच दिसत नाही. त्यातच हा प्रकल्प बंदिस्त असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचाही त्रास होत नाही. सर्व कचºयावर प्रक्रिया होत असल्याने डम्पिंगमुक्त शहरासाठी हा पथदर्शी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे अंबरनाथ शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.अंबरनाथमध्ये दररोज १०० टन कचराअंबरनाथ पालिका हद्दीत ९० ते १०० टन कचरा दररोज निर्माण होत आहे. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया न करताच थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळखत तयार होते. मात्र, हे प्रमाण अल्प असल्याने शहरात कचºयावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. अंबरनाथ पालिकेच्या या प्रकल्पासाठी शासनाने निधीची तरतूद केली आहे. मात्र, या प्रकल्पासाठी पालिकेच्या तिजोरीवर किती कोटींचा भार पडणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या शक्य आहे की नाही, याचा विचार करण्याची गरज पडणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरulhasnagar-acउल्हासनगर