सोशल मीडियातून पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 05:49 IST2019-02-22T05:49:24+5:302019-02-22T05:49:49+5:30

वसई तालुक्याच्या नायगाव येथील पाली गावातील स्विटी शानल मच्याडो (३७) हिचे परदेशातील जर्मनी येथे काम करणाºया शानल लेस्ली मच्याडो (३८) याच्यासोबत २ फेब्रुवारी २०११ ला ख्रिस्ती धर्मानुसार कायदेशीर विवाह केला

In the social media filed an offense against a defamatory husband | सोशल मीडियातून पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियातून पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

नालासोपारा : परदेशातील जर्मनी येथे पाकिस्तानी महिलेशी पाहिले लग्न करून सात वर्षांचा मुलगा असल्याची माहिती लपवून भारतामध्ये दुसरे लग्न करणाºया पत्नीची सोशल मीडियावरून बदनामी करणाºया पती विरोधात वसई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे.

वसई तालुक्याच्या नायगाव येथील पाली गावातील स्विटी शानल मच्याडो (३७) हिचे परदेशातील जर्मनी येथे काम करणाºया शानल लेस्ली मच्याडो (३८) याच्यासोबत २ फेब्रुवारी २०११ ला ख्रिस्ती धर्मानुसार कायदेशीर विवाह केला परंतु शानल याचे जर्मनी येथे पाकिस्तानी महिलेशी पहिले लग्न झालेले असून ७ वर्षाचा मुलगा असल्याचे तिला कळले. स्वीटी पासून ही माहिती लपवून शानल याने दुसरे लग्न केल्याचेही उघड झाले आहे. तसेच तिच्या उदरनिर्वाहाकडे व शरीर सुखाकडेही दुर्लक्ष करत मानिसक व शारीरिक छळ करत होता.
चारित्र्यावर संशय घेत स्वीटी व तिच्या आईवडीलांना शानल धमकी देत होता. त्याने स्वीटी जिथे कामाला आहे तेथील सहकाºयांना फोन करून आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंकडीन, ट्वीटर या सोशल मीडियावर बदनामी सुद्धा केली आहे. मंगळवारी वसई पोलीस ठाण्यात जाऊन स्वीटीने आपल्या पतीविरोधात तक्र ार दिली आहे.
 

Web Title: In the social media filed an offense against a defamatory husband