अंगणात रंगला सापांचा मेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:55 IST2018-08-22T16:53:42+5:302018-08-22T18:55:05+5:30

the snakes in the courtyard | अंगणात रंगला सापांचा मेळ

अंगणात रंगला सापांचा मेळ

डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या ग्रामस्थांना धामण जातीच्या सापांचा मेळ पाहण्याचा अनोखा अनुभव लाभला. या गावच्या आंबेमोरा रस्त्याच्या वाघ्याबाबा मंदिरालगतच्या विजय बेंडगा यांच्या अंगणात हे बिनविषारी सर्प क्रीडेत दंग झाले होते. उपस्थितांपैकी त्यांना कोणीही त्रास दिला नाही. त्यामुळे  काही वेळानंतर ते आपापल्या मार्गाने निघून गेल्याची माहिती सर्पमित्र रेमंड डिसोझा यांनी दिली. काहींनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपून सोशलमीडियावर अपलोड केल्याने, बहुतेक व्हाट्सअप ग्रुपवर सध्या या चित्रफितीचीच चर्चा रंगताना दिसत आहे.

Web Title: the snakes in the courtyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.