विरारमधील एकाच कुटुंबातील सहा जण अचानक झालेत बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:38 IST2017-11-02T12:38:19+5:302017-11-02T12:38:41+5:30

विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  

six of a family missing in Virar | विरारमधील एकाच कुटुंबातील सहा जण अचानक झालेत बेपत्ता 

विरारमधील एकाच कुटुंबातील सहा जण अचानक झालेत बेपत्ता 

वसई - विरारमधील शर्मा कुटुंबातील सहा जण 15 ऑक्टोबरपासून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.  सुरेंद्र शर्मा ( वय 50), मालती शर्मा (वय 52), वरूण शर्मा (वय 29) प्रियांका शर्मा (वय 16), अश्विनी शर्मा (वय 3), अनिता शर्मा (वय 60 ) अशी शर्मा कुटुंबातील बेपत्तांची नावं आहेत.  विरार पश्‍चिम येथील ग्लोबल सिटीमध्ये हे राहत होते. दरम्यान, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शर्मा कुटुंबातील सून संगीता शर्मा या अमरावती येथे राहतात. त्या जून महिन्यात बाळंतपणासाठी आईकडे गेल्या होत्या. संगीता या वरुण शर्मा यांच्या पत्नी आहेत. 

बाळंतपणापासून संगीता या अमरावतीमध्येच राहत आहेत. 15 जूनला त्यांनी एका मुलीला जन्म दिला. 14 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा पती वरुणसोबत संपर्क झाला होता. पण त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही संपर्क होत नसल्याने त्यांनी गुगलवरुन अर्नाळा पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक मिळवला व मेलद्वारे शर्मा कुटुंबीयांची बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.  दरम्यान, पोलिसांना शर्मा कुटुंब राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व कुटुंबीय पहाटेच्या सुमारास समान घेऊन एका कारमधून निघून गेल्याचे दिसून आले आहे. त्यांचे मोबाइलचे लोकेशन सुरुवातीला नाशिक व त्यानंतर सुरत असे दाखवले जात होते. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाइल बंदच आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत, मात्र ठोस अशी माहिती त्यांना अद्यापपर्यंत मिळालेली नाही

Web Title: six of a family missing in Virar