श्रद्धाला मांसाहार करण्यासाठी करायचा बळजबरी, श्रद्धाच्या मैत्रिणीनं दिली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 09:48 IST2022-11-21T09:48:00+5:302022-11-21T09:48:22+5:30
श्रद्धाची मैत्रीण पूनम बिडलान हिने सांगितले की, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिला सांगितल्या होत्या. श्रद्धा आणि आफताब हे एव्हरशाइन भागात भाड्याने राहात होते.

श्रद्धाला मांसाहार करण्यासाठी करायचा बळजबरी, श्रद्धाच्या मैत्रिणीनं दिली धक्कादायक माहिती
वसई : आफताब हा श्रद्धाला मांसाहार खाण्यासाठी तिच्यावर बळजबरी करायचा, ती मांसाहार पदार्थ खात नसल्याने तिला तो मारहाण करायचा, अशी माहिती श्रद्धाच्या एका मैत्रिणीने दिली आहे.
श्रद्धाची मैत्रीण पूनम बिडलान हिने सांगितले की, श्रद्धाच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिला सांगितल्या होत्या. श्रद्धा आणि आफताब हे एव्हरशाइन भागात भाड्याने राहात होते. त्या दरम्यान श्रद्धा पूनमकडे तीन वेळा मदत मागण्यासाठी आली होती. एकदा पूनम श्रद्धासोबत तुळींज पोलिस ठाण्यातही गेली होती. त्यांनी तिथे तक्रारही दाखल केली होती. एफआयआर नोंदवण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी श्रद्धाही तयार झाली होती, असे पूनमने सांगितले.