धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:05 IST2024-12-17T19:04:56+5:302024-12-17T19:05:26+5:30
बोळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
- मंगेश कराळे
नालासोपारा : अर्नाळा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने मंगळवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोळींज पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनसाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. बोळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
विरारच्या बोळींज परिसरातील साई ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रतीकांत भद्रेशेट्टे (३५) यांनी मंगळवारी दुपारी घरातील छताच्या हुकाला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्यात दीड वर्षाची मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.
पत्नी व मुलगी कार्यक्रमासाठी गेल्यावर ही घटना केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या भावाचा पुण्यातील राहत्या घरी ऑगस्टमध्ये शॉक लागून मृत्यू झाल्याने ते तेव्हापासून मानसिक संतुलन बिघडले होते. याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.