धक्का लागल्याने डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, वालीव नाका येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 12:09 AM2021-02-17T00:09:36+5:302021-02-17T00:15:47+5:30

Crime News : वसईतील लेडीज गार्मेंट कंपनीत काम करणारा मोनिरुद्दीन गायन (२२) आणि तौफिक मीर हे दोघे रविवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून फेरफटका मारण्यासाठी कंपनीबाहेर पडले.

Shocking incident at Valiv Naka | धक्का लागल्याने डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, वालीव नाका येथील धक्कादायक घटना

धक्का लागल्याने डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, वालीव नाका येथील धक्कादायक घटना

Next

नालासोपारा : रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर मित्रांसोबत फेरफटका मारत असताना २२ वर्षीय तरुणाचा दोघांना धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करत त्याच्या डोक्यात रस्त्यावरील दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे.
वसईतील लेडीज गार्मेंट कंपनीत काम करणारा मोनिरुद्दीन गायन (२२) आणि तौफिक मीर हे दोघे रविवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून फेरफटका मारण्यासाठी कंपनीबाहेर पडले. वालीव नाक्यावरून लहान ब्रिज या ठिकाणी आल्यावर तौफिक याचा दोघा तरुणांना धक्का लागला. याच गोष्टींच्या रागातून दोघांनी तौफिकला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. गायन व अब्दुल खैर बाशार हलदर (४६) व त्याच्या कुटुंबीयांनी यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोन्ही आरोपीनी फोन करून मित्रांना बोलावले आणि लाकडी दांडक्याने सर्वांना मारहाण केली.

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला व यातील तरुणाच्या डोक्यात आरोपींनी दगड घालून त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. सहाही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी आहे.
- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

Web Title: Shocking incident at Valiv Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.