वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:57 IST2020-12-10T17:45:22+5:302020-12-10T17:57:34+5:30
राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
वसई :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली असल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतला दिली.
दरम्यान या बाबतीत अधिक बोलताना पाटील यांनी सांगितले की,हा सातवा वेतन आयोग लागू जरी झाला असला तरी येथील महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनश्रेणी ही दि. 01 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहे.