शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची बेजबाबदारी! रक्तबंबाळ अवस्थेत जखमी विद्यार्थाला पाठविले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 19:44 IST

पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक व शिक्षिकेकडे याबद्दल संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेस महापालिकेची शाळा आहे. यातील शाळा क्र.३० हिंदी माध्यमाच्या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या सागर शर्मा याचे शाळेत अन्य एका विद्यार्थ्याशी भांडण झाले.याप्रकरणी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ चालवली आहे. यापूर्वी देखील या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा गैरप्रकार चव्हाट्यावर येऊनही पालिकेने त्यांना पाठीशी घातले आहे.  

मीरारोड - शाळेतजखमी झालेल्या चौथीच्या विद्यार्थ्यावर उपचार न करता रक्तबंबाळ अवस्थेतच त्याला घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार महापालिकेच्या भाईंदर येथील शाळेत घडला आहे. पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापक व शिक्षिकेकडे याबद्दल संताप व्यक्त केला. परंतु, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाईस टाळटाळ केली आहे.भाईंदर पश्चिमेस महापालिकेची शाळा आहे. यातील शाळा क्र.३० हिंदी माध्यमाच्या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या सागर शर्मा याचे शाळेत अन्य एका विद्यार्थ्याशी भांडण झाले. त्यात सागरच्या डोक्याला मार लागून रक्ताची धार वाहू लागली. मात्र, वर्ग शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सागर याच्यावर प्रथमोपचार केले नाहीत.सागर घरी येताच कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेले. त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले. आई-वडिलांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने घडला प्रकार सांगितला. यामुळे संतप्त पालकांनी शाळेत येऊन शिक्षिका ममता यादव व मुख्याध्यापक सिंग यांना जाब विचारला. जखमी मुलाला तुम्ही दोन तास शाळेत बसवून का ठेवले ? जखमी मुलावर प्रथमोपचार करण्याची किंवा त्याला जवळच्या इस्पितळात नेणे ही तुमची जबाबदारी नाही का ? असे सवाल पालकांनी केले. रक्तबंबाळ अवस्थेत सागरला तुम्ही घरी पाठवले, पण वाटेतच त्याला काही झाले असते तर त्याची जबाबदारी कुणाची? अशा प्रश्नांची सरबत्ती पालकांनी केली.याप्रकरणी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बेजबाबदार शिक्षक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ चालवली आहे. यापूर्वी देखील या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा गैरप्रकार चव्हाट्यावर येऊनही पालिकेने त्यांना पाठीशी घातले आहे.  

आधी या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर देखील अधिकाऱ्याने कार्यवाही केली नाही. जखमी विद्यार्थ्याला तसेच उपचाराविना घरी पाठवल्याच्या प्रकरणाची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. - दीपक पुजारी, उपायुक्त, मनपा शिक्षण विभाग

 

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा