शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

वसईतील १२२ कोटींच्या घोटाळ्याची कारवाई थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:29 IST

तब्बल १२२ कोटींचा घोटाळा केला म्हणून २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर मनपातील मोठ्या घोटाळ्याची पोलखोल झाल्याने वसई तालुक्यात तसेच मनपात खळबळ माजली आहे.

नालासोपारा : तब्बल १२२ कोटींचा घोटाळा केला म्हणून २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यावर मनपातील मोठ्या घोटाळ्याची पोलखोल झाल्याने वसई तालुक्यात तसेच मनपात खळबळ माजली आहे. मात्र, गुन्हे दाखल होऊन तब्बल २४ दिवस उलटून गेले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे मनपा आणि विरार पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत आहे.वर्षभरापूर्वी विधान परिषदेमध्ये या घोटाळ्यासंदर्भात प्रश्न निर्माण झाल्यावर वसई - विरार मनपाने विरार पोलीस ठाण्यात तक्र ार दिली होती. मात्र, कोणतेही पुरावे सादर केले नव्हते तसेच विरार पोलिसांनी ५ वेळा पत्रव्यवहार करून पुरावे सादर करण्याची नोटिस मनपाला बजावली होती. कोणताही पुरावा नसल्याने ठेकेदारांवर कारवाई करण्यास विरार पोलीस घाबरत असून पुरावे मिळूनही कारवाईस दिरंगाई का करत आहेत, पोलिसांवर राजकीय दबाव तर नाही ना अशी चर्चा जनसामान्यांत सुरू आहे.काय होते प्रकरण...वसई विरार मनपाच्या ३, १६५ ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीयभत्ता, घरभत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. एकूण १२२ कोटींच्या या घोटाळ्यात २९ करोड ५० लाख रुपयांच्या शासकीय महसुलाचाही समावेश असून ९२ करोड ५० लाखरु पये कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारावरच डल्ला मारल्या प्रकरणी मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.गुन्हे दाखल झालेले २५ घोटाळेबाज ठेकेदार...दिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटील), संखे सिक्युरिटी सर्व्हिस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओमसाई इंटरप्राइजेस (विनोद पाटील), बालाजी सर्व्हिस (मंगरूळे बी. दिगंबरराव), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्तिट्रकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सदगुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबरकॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), आकाश इंटरप्रायजेस (विलास चव्हाण), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरु खकर), बी एलहोणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकरआणि श्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)विधानपरिषदमध्ये मुद्दा गाजल्यावर मनपाने एक वर्षांपूर्वी तक्र ार दिली पण काहीही पुरावे दिले नाहीत. सहा महिन्यांपासून पाठपुरावा व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी आदेश दिल्यानंतर दोषी ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले पण पुढील कारवाई मात्र शून्य आहे!- मनोज पाटील(तक्रारदार आणि उपाध्यक्ष, बीजेपी, वसई)सर्व ठेकेदारांना नाेिटस दिल्या असून १० जणांनी कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा केलेली आहे. मनपाला आॅडिट पाठविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला असून ते अद्याप प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.- विवेक सोनावणे, (तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक,विरार पोलीस ठाणे)५ ते ६ दिवसांपूर्वी विरार पोलिसांचे पत्र आले असून त्यात खूप माहिती मागितली असून त्यानुसार ती त्यांना लवकरात लवकर देण्यात येईल.- बळीराम पवार(आयुक्त, वसई विरार महानगरपालिका)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार