शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

श्रेय लाटण्याचा सवरांचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:49 AM

पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे.

- हितेंन नाईकपालघर : पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे. या योजनांना २०१७-१८ सालात मंजुरी मिळूनही त्यातील ९३ ची कामेच सुरू होऊ शकली नसल्याने नाईलाजाने ही कामे या आर्थिक वर्षात ढकलण्याची पाळी सरकारवर आली आहे. त्याचेच श्रेय सवरांनी लाटले.राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री ह्यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात जिल्ह्यातील १४२ पाणीपुरवठा योजनांसाठी २६२ कोटी रुपये आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्या मुळे मंजूर झाल्याचा दावा करून त्याचे फुकटचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला गेला होता. पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी पत्र पाठवून आपल्याला ही माहिती दिल्याचे पालकमंत्र्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे पाण्याच्या योजनांच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता.पाणीपुरवठा मंत्र्यांच्या पत्रांचा हवाला देत पालकमंत्र्यांनी ज्या १४२ योजनांसाठी २६२ कोटीचा निधी आपण सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणल्याचे सांगत आहेत, त्या योजना सन २०१७ मध्येच मंजूर करण्यात आल्या असून ह्या योजने अंतर्गत मंजूर झालेल्या काही योजनांच्या पाईपलाईन टाकणे, टाक्या उभारणे आदी कामे जवळपास पूर्णत्वास आली आहेत. ह्या १४२ योजना पैकी ३ योजना ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या तर १३९ योजना जिल्हापरिषद विभागाच्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी २०१७ मध्ये या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना सातपाटी, पास्थळ, कुडण, शिरगाव, दांडी, धनसार आदी योजनांच्या मंजुरी आणि निधीची माहिती दिली होती. त्यामुळे मतदारांना बनविण्याचा हा प्रयत्न पालकमंत्री करीत तर नाहीत ना?जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत ८ कोटी २२ लाख ७८ हजार अनुदान प्राप्त झाले असून, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल अंतर्गत ९७ लाख ३५ हजार निधी, विशेष योजनेंतर्गत १२ कोटी ७० लाख, जिल्हा नियोजन बिगर आदिवासीसाठी ८ कोटी ४७ लाख अशा विविध हेड खाली ३० कोटी ३७ लाख १३ हजार निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी १२ कोटी ९२ लाख ७४ हजार ४१९ इतका निधी २०१८ अखेर खर्चही करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मधील प्रस्तावित १४२ पेयजल योजने पैकी ३ कामे मजीप्रा.ची सोडल्यास उर्वरीत १३९ कामासंबंधातील प्रक्रिया पूर्ण न झाल्याने यातील ९३ योजना सन २०१८-१९ च्या वर्षात पुन्हा आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे फक्त ४६ योजनांची कामे सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आणि १४२ कामे सुरू असल्याचे फुकटचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न पालकमंत्र्या कडून केला जात असल्याची टीका विरोधका कडून केली जात आहे.त्यामुळे नवीन सन २०१८-१९ या वर्षात ११ नवीन योजनांची भर पडली असून मागच्या वर्षातील ९३ योजना अश्या १०४ योजना सध्या प्रस्तावित असून ह्या योजनांच्या खर्चासाठी सुमारे १०० कोटी ९० लाखाचा निधीची गरज भासणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.फुकटचे श्रेय उपटण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.त्यांचा दावा हास्यास्पद असून ह्या वर्षातील सर्व कामे पूर्णत्वास कशी जातील यासाठी प्रयत्न करावेत. - सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी पक्ष. 

टॅग्स :vishnu savaraविष्णू सावराpalgharपालघर