वसईत कोट्यावधी रुपयांचा चंदनाचा साठा पकडला, वालीव पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 19:08 IST2022-12-26T19:05:30+5:302022-12-26T19:08:43+5:30
पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे.

वसईत कोट्यावधी रुपयांचा चंदनाचा साठा पकडला, वालीव पोलीस आणि वनविभागाची संयुक्त कारवाई
मंगेश कराळे
नालासोपारा : पुष्पा चित्रपटातील चंदनाच्या तस्करी प्रमाणे वसईत चंदन तस्करीचे मोठे रॅकेट पकडले आहे. एका मोठ्या ट्रकमधून काही संशयास्पद सामान जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून वालीव पोलीस आणि वनविभागाने रविवारी पहाटे संयुक्त कारवाई केली आहे.
पोलिसांनी कामण भिवंडी रोडवरील कामण बिट चौकी याठिकाणी एक मोठा कंटेनर भरून अंदाजे ३० ते ३५ घनमीटर साठा असलेले सहा करोड रुपये पेक्षा अधिक किंमतीचे चंदन जप्त केले आहे. कांद्याच्या आड चंदन भरून उरणच्या न्हावा शेवा बंदरात हा कंटेनर जात होता.
पोलिसांनी चालक व अजून एक असे दोघाना अटक केली असून सध्या वन विभाग आणि पोलिसांकडून पंचनामा करत आहे. तर दुसरीकडे आरोपींची चौकशी सुरू आहे. हे चंदन आंध्र प्रदेशातून भिवंडी मार्गे नावाशिवा बंदरात नेत असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.