शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

साखरे धरणाची सुरक्षा रामभरोसे; महाराष्ट्र जीवन प्रधिकरण उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:19 PM

संरक्षक भिंत, सुरक्षारक्षक नाहीत

डहाणू : डहाणू तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील अणुशक्ती केंद्र्र, एमआयडीसी तारापूर, तसेच बी.ए.आर.सी., डहाणू थर्मल पॉवर स्टेशन या मोठ्या प्रकल्पांना दररोज लाखो लीटर्स पाणीपुरवठा करणाऱ्या वाणगांवच्या साखरे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. साखरे धरणाची सुरक्षा तसेच देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेले महाराष्टÑ जीवन प्रधिकरण याबाबत कोणतीच खबरदारी घेत नसल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.तारापूर येथील वीजनिर्मिती करणाºया तारापूर अणूशक्ती केंद्राला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने वाणगाव जवळील साखरे गावात मोठे धरण बांधले आहे. एकूण पाचशे मीटर लांबी असलेले हे धरण वाणगाव - वधना या राज्यमार्गाला लागून आहे. या धरणाच्या आजुबाजुला मोठमोठे डोंगर आहेत. धरण परिसर खूप मोठा असला तरी कुठेही संरक्षक भिंत नाही. धरणाचे एक प्रवेशद्वार रात्रंदिवस उघडेच असते. तेथे रखवालदार किंवा सुरक्षारक्षक नसल्याने कोणतेही वाहन किंवा अज्ञात व्यक्ती थेट धरण क्षेत्रात प्रवेश करतात. मार्च, एप्रिल, मे, जून महिन्यात तर धरण परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो. तरुणाई येथे पार्ट्या करते. तर मद्यधुंद अवस्थेत धरणात उतरून मजा करीत असतात. गेल्या वर्षी एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय, या धरणात वीस - पंचवीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्यापेक्षा गाळ, केरकचरा मोठ्या प्रमाणात असून त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे महाराष्टÑ जीवन प्रधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.नुकतेच या धरणापासून २५० मीटर अंतरावर तारापूर येथील एका कंपनीच्या टँकरमधून घातक रसायन टाकल्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आठ, दहा दिवस तर ग्रामस्थांनी पाणीही भरले नव्हते. याबाबत वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.चार - पाच वर्षांपासून साखरे धरणाजवळ मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर आसपासच्या परिसरातील शेकडो तरूण धरणात उतरून मौजमजा करतात. तसेच बिअरच्या रिकाम्या बाटल्याही पडलेल्या दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने जीवन प्रधिकरण उपाययोजना करीत नसल्याने भविष्यात येथे घातपाताची भीती ग्रामस्थ व्यक्त करतात.

टॅग्स :Damधरण