शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

रूपेश जाधव यांचा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 2:49 AM

या महानगराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करतांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत दलित आणि ख्रिस्ती मतांची बेगमी करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित नगरसेवकांना धक्का देऊन महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्रीक्स यांची निवड केली.

- शशी करपेवसई : या महानगराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करतांना हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत दलित आणि ख्रिस्ती मतांची बेगमी करण्यासाठी त्यांनी प्रस्थापित नगरसेवकांना धक्का देऊन महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्रीक्स यांची निवड केली.वसई विरार महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक येत्या २८ डिसेंबरला आहे. यासाठी हिेतेंद्र ठाकूर कुणाची निवड करतील याकडे सगळ््यांचे लक्ष होते. त्यांनी नेहमीप्रमाणे मर्जीतील नगरसेवकांची निवड केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी रुपेश जाधव आणि उपमहापौरपदासाठी प्रकाश रॉड्र्ीक्स यांनी अर्ज भरले. दोनच अर्ज दाखल झाल्याने या दोघांची बिनविरोध निवड निश्चित असून २८ डिसेंबरला त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.यांचा पत्ता कटबहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान उपमहापौर उमेश नाईक यांनी नालासोपारा नगराध्यक्षपदासह नगरसेवक म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. सध्या ज्येष्ठ असलेल्या नाईक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना उपमहापौरपदावरूनही पाय उतार करण्यात आले आहे.गेली सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत असलेले, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांना यावेळीही डावलण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक नितीन राऊत, सुदेश चौधरी, भारती देशमुख यांच्याही नावाची चर्चा होती.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार