शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांचा फेरा; १०-१२ किमी अंतरावर जाण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:20 AM

वाड्यातील कुडूस येथे हवे केंद्र

वाडा : भिवंडी ग्रामीण मतदारसंघात वाडा तालुक्यातील कुडूस, नेहरोली परिसरातील ५५ गावे येतात. या गावांमध्ये भाताचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या साडेसात हजारांहून अधिक आहे. या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात भात खरेदी केंद्र नसल्याने येथील शेतकऱ्यांना भात विक्रीसाठी शहापूर व विक्रमगड मतदारसंघांतील वाडा तालुक्यातील समाविष्ट असलेल्या खरेदी केंद्रांवर भात विक्रीसाठी जावे लागत आहे. शेतकऱ्यांवर भात विक्रीसाठी गावापासून १० ते १२ किलोमीटर लांब अंतरावर जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुडूस येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

वाडा तालुका भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघांत विभागाला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे करत आहेत. तर, शहापूर मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा व विक्रमगड मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा करत आहेत.

शहापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील परळी, गारगाव, मानिवली, कळंभे व खैरे-आंबिवली पाच ठिकाणी आधारभूत पद्धतीने भात खरेदी केंद्र सुरू आहेत. तर विक्रमगड मतदारसंघात वाड्यातील पोशेरी, गोऱ्हे, गुहिर व खानिवली या केंद्रांत आधारभूत भातखरेदी सुरू आहे. मात्र, वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या ५५ गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असे एकही भात खरेदी केंद्र नसल्याने येथील साडेसात हजार शेतकऱ्यांवर भात विक्रीसाठी दहा ते बारा किलोमीटर लांब अंतरावरील अन्य मतदारसंघातील केंद्रांवर भात विक्रीसाठी जावे लागत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. कुडूस परिसरात भात खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मी याबाबत पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घेतो, असे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी  सांगितले.

खानिवली केंद्रात साठवणूक क्षमता नाहीतालुक्यातील खानिवली येथे भात खरेदी केंद्र आहे, मात्र येथे मोठ्या प्रमाणात धानसाठा होईल अशी जागा नसल्याने येथील खरेदी काहीवेळ थांबवली आहे. त्यामुळे जवळच्या खैरे आंबिवली या केंद्रावर शेतकरी भात विक्रीसाठी नेत आहेत. मात्र, वाढीव खरेदीची क्षमता या केंद्रालाही दिलेली नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे.