शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

नदी प्रदूषण : दोन महिन्यांत कृतीआराखडा सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 05:01 IST

नदी प्रदूषण रोखण्याचा मुद्दा : राज्य सरकारला घ्यावा लागणार पुढाकार, उल्हास नदीतील प्रदूषणाची घेतली दखल

मुरलीधर भवार

कल्याण : प्रदूषित नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व राज्यांनी दोन महिन्यांत कृतीआराखडा सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने नुकतेच दिले आहेत. देशात सगळ्यात जास्त प्रदूषित नद्या या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हा आराखडा बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.

२०१४ मधील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात ४२ नद्या प्रदूषित होत्या. मात्र, त्यानंतरही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कोणतीही ठोस योजना हाती घेतली नाही. गंगा स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र, राज्य सरकारने ‘नमामी चंद्रभागा’ या योजने अंतर्गत चंद्रभागा ही एकमेव नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. दुसरीकडे सध्या देशातील प्रदूषित नद्यांची संख्या ३५१ वर पोहोचली आहे.२०१४ मधील केंद्रीय प्रदूषण नियंत्रणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील २८ प्रदूषित नद्यांमध्ये उल्हास नदी होती. ही नदी बारमाही वाहते. या नदीच्या पाण्यावर ४८ लाख लोकांची तहान भागविली जाते. त्याचबरोबर राजमाची डोंगरापासून पार कल्याणपर्यंतची भातशेती व हंगामी शेती या नदीच्या पाण्यावर होते. त्यामुळे उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने २०१५ पासून ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ हा प्रकल्प हाती घेतला होता. नदी प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाही. त्यामुळे ‘वनशक्ती’ने हरित लवादाकडे दाद मागितली. उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी लवादाने २०१७ ची डेडलाइन दिली होती. मात्र, ती पाळली गेलेली नाही. मात्र, सांडपाणी व मलनिस्सारण प्रकल्पासाठी अमृत योजनेअंतर्गत केडीएमसी, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर या दोन पालिकांना निधी दिला होता. हे प्रकल्प सुरू झाल्यावर नदीचे प्रदूषण कमी होईल, असा दावा राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात केला आहे. आता लवादाने सर्वच राज्यांना प्रदूषण रोखण्याचा कृती आराखडा दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश दिले.दंड भरण्याची मानसिकता नाही, दंडाच्या रकमेतून रोखणार नदीचे प्रदूषण, सांडपाणी प्रकल्प अपुऱ्या क्षमतेचाच्रासायनिक सांडपाणी, घरगुती सांडपाणी आणि मलमिश्रित पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीपात्रात सोडले जाते. नदीचे प्रदूषण करणाºयांना लवादाने ९५ कोटींचा दंड ठोठवला आहे. दंडाच्या रकमेतून नदीचे प्रदूषण रोखले जाणार आहे.च्मात्र, दंड भरण्याची मानसिकता प्रदूषण करणाºयांची नाही. त्यामुळे त्यांच्याकडून टोलवाटोलवी केली जात आहे. उल्हास नदीत उल्हासनगरमधील सांडपाणी सोडले जात होते.च्तेथील महापालिकेने त्यांचा सांडपाणी प्रकल्प तयार केला असला तरी तो पुरेश क्षमतेनुसार सुरू नाही. अंबरनाथ पालिकेचा प्रकल्प सुरू झालेला नाही, अशी माहिती ‘वनशक्ती’चे पदाधिकारी अश्वीन अघोर यांनी दिली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारriverनदी