बंदी असूनही तुंगारेश्वर येथे हुल्लडबाजी; पर्यटकांची बेफिकिरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:24 AM2019-08-16T00:24:37+5:302019-08-16T00:25:34+5:30

वसईमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असूनही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे.

Rioting at Tungareshwar despite the ban; Tourist disregard, neglect of administration | बंदी असूनही तुंगारेश्वर येथे हुल्लडबाजी; पर्यटकांची बेफिकिरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

बंदी असूनही तुंगारेश्वर येथे हुल्लडबाजी; पर्यटकांची बेफिकिरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

googlenewsNext

विरार : वसईमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असूनही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे. प्रशासन दावा करत असली तरी सुरक्षेसाठी येथे यंत्रणा तसेच सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत. प्रशासन आता कलम १४४ द्वारे येथे कारवाई करणार आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर वसई येथील तुंगारेश्वर या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अनेक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने पर्यटक सहलीसाठी येतात. परंतु हे स्थळ आता धोकादायक बनू लागले आहे. गेल्या वर्षी उत्साहाच्या भरात पाच तरुण धबधब्याजवळ गेले आणि अडकले होते. मोठी दुर्घटना होण्याआधीच त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवण्यात आले. पुन्हा तशी दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यंदा धबधब्याच्या १०० मीटर जवळ जाण्यास बंदी घातली होती. परंतु बंदी असूनही पर्यटक मोठ्या संख्येने धबधब्याजवळ जात व नियमांचे उल्लंघन करत आहेत. तसेच सेल्फी काढण्यासाठी तरुणांची जीवघेणी हुल्लडबाजी सुरू आहे.
पर्यटकांच्या या गैरवर्तनामुळे गेल्या महिन्यात तीन तरुण तुंगारेश्वरच्या धबधब्यात पोहोण्यासाठी उतरले होते. त्यातील एका तरुणाला धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. पर्यटकांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध करून देण्यात येणार होते. मात्र, येथे कुठेच सुरक्षा रक्षक दिसत नाहीत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येणाºया उपाय योजना अद्यापही कागदावरच असल्याने पर्यटकांचा जीव अजूनही धोक्यात आहे. याच बरोबर जवळ जाणाºया पर्यटकांना रोखण्यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात येणार होते. मात्र, ते देखील कुठे दिसले नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन कसलीच काळजी घेत असल्याचे दिसत नाही. येथे कोणतीही मोठी घटना घडल्यास महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागते. पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडे कोणतीच साधने उपलब्ध नसल्याने पर्यटकांची सुरक्षा वाºयावर आहे.
यावर तोडगा म्हणून प्रशासन कलम १४४ द्वारे कारवाई करणार आहे. प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेचा दावा करत असली तरी पर्यटन स्थळी कोणताच बंदोबस्त नाही. बंदीचा नियम जिल्हाधिकाºयांनी काढला परंतु त्यासाठीचे प्रयत्न काही दिसत नाहीत.

आम्ही धोकादायक धबधब्यांपासून १०० मीटर अंतर ठेवा असा नियम केला आहे. तसेच जर कोणीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थांबवण्याकारीता पोलीस तैनात केले आहेत. कलम १४४ द्वारे देखील कारवाई केली जाणार. प्रशासनातर्फे सर्व उपाय योजना राबवलेल्या आहेत. पर्यटकांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी

Web Title: Rioting at Tungareshwar despite the ban; Tourist disregard, neglect of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.