वसईहून थेट गाठा कोकण, पश्चिम रेल्वे उभारणार नवीन कोचिंग टर्मिनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:07 IST2025-04-05T13:07:35+5:302025-04-05T13:07:54+5:30

Vasai Railway Station: पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे आठवे टर्मिनस ठरणार असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहेत.

Reach Konkan directly from Vasai, Western Railway to build new coaching terminus | वसईहून थेट गाठा कोकण, पश्चिम रेल्वे उभारणार नवीन कोचिंग टर्मिनस

वसईहून थेट गाठा कोकण, पश्चिम रेल्वे उभारणार नवीन कोचिंग टर्मिनस

- महेश कोले

मुंबई -  पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील हे आठवे टर्मिनस ठरणार असून, यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहेत. प्रकल्पासाठी १५० कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 
पश्चिम रेल्वेच्या २०२३-२४ या वर्षातील वाहतूक सुविधा अंतर्गत नवीन प्रकल्पांसाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. आता मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच इंजिनियरिंग स्केल प्लॅन तयार केला जाईल.  

तीन मार्गिका असणार
नवीन टर्मिनसमध्ये टर्मिनसवर तीन मार्गिका असतील आणि येथून फक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म रिटर्न ट्रेनसाठी एक आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेन उभ्या करण्याची सोय असेल,  उर्वरित मार्गिकेवर ट्रेन पार्किंगची व्यवस्था असेल.  नवीन टर्मिनस सुरू झाल्यावर आणखी १२ अतिरिक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची क्षमता वाढणार आहे.  

वसई रोड येथे नवीन कोचिंग टर्मिनस विकसित करण्याची योजना त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वे बोर्डाने अलीकडेच या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title: Reach Konkan directly from Vasai, Western Railway to build new coaching terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.