शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने हात कुरतडला, वृद्धेचा मृत्यू; भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:53 IST

सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते.

मीरारोड : अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा हात उंदराने कुरतडल्याची धक्कादायक घटना भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी या सरकारी रुग्णालयात सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सायंकाळी या वृद्धेचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता, उंदरांचा सुळसुळाट यांमुळे येथील कारभाराची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली आहेत.

 सोमवारी सकाळी त्यांचा मुलगा भेटण्यासाठी गेला असता हा प्रकार समोर आला. यावेळी उंदीर त्यांना पाहताच पळून गेला.  मीरारोड मधील प्लेझंट पार्क भागात राहणाऱ्या सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात  दाखल केले होते. सोमवारी पहाटे सुहासिनी यांचा मुलगा आईला भेटण्यास अतिदक्षता विभागात गेला असता त्यांनी उंदीर पळून जाताना पाहिला. तर चादर रक्ताने माखलेली दिसली. पळून जाताना उंदरांचे रक्ताने माखलेले पायही बेडशीटवर दिसत होते. हात उंदराने कुरतडल्याने जखम होऊन सूज आली होती. 

चौकशी समिती नेमली; दोषींवर कठोर कारवाई करणारआयसीयूसारख्या विभागात उंदरांचा मुक्त संचार होत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर वा परिचारिकांच्या हा प्रकार लक्षात कसा आला नाही, याबाबतही संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी उद्धवसेनेच्या जिल्हा संघटक नीलम ढवण व उपजिल्हाप्रमुख सुभाष केसरकर, शहराध्यक्ष प्रशांत सावंत, क्षमा गांधींसह मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे, सचिन पोपळे व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनास जाब विचारत ठिय्या मांडला व संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून याप्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे व त्यासाठी चौकशी समिती नेमल्याचे अधीक्षक डॉ. जाफर तडवी यांनी सांगितले. 

रुग्णालयातील सुविधा व्हेंटिलेटरवर असल्याचे उघडभीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचा दावा वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत. याशिवाय येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मात्र, या घटनेमुळे आणि सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे स्वतः व्हेंटिलेटर असल्याचेच समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rat bites elderly woman in ICU, leading to death.

Web Summary : In Bhayandar, an 89-year-old woman died after a rat bit her in the ICU of a government hospital. The family discovered the incident. Investigation started; action assured.
टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यूdoctorडॉक्टर