रॅगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा, नालासोपा-यातील प्रकार, अद्याप अटक नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:40 IST2017-09-24T00:40:43+5:302017-09-24T00:40:54+5:30
सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादव (१३) याच्या रॅंगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

रॅगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा, नालासोपा-यातील प्रकार, अद्याप अटक नाही
वसई : सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादव (१३) याच्या रॅंगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथील विद्याभारती विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादवने रॅगिंगला कंटाळून आपल्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचा मोठा भाऊ वेळेत घरी आल्याने त्रिमूर्तीला वाचवण्यात यश आले आहे. सध्या त्रिमूर्तीच्या प्रकृत्तीत थोडी सुधारणा होऊ लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मालाड येथे राहणारे त्रिमूर्तीचे कुटुंबीय वर्षभरापूर्वीच नालासोपारा येथे राहावयास आले होते. त्रिमूर्ती शिकत असलेल्या शाळेत काही विद्यार्थी त्याची रॅगिंग करीत होते. सततच्या जाचाला कंटाळलेल्या त्रिमूर्तीने रविवारी संध्याकाळी पायाला डंबेल्स बांधून छताच्या रॉडला अडकवून गळफास लावला होता. मात्र, मोठ्या भावाने
त्याला त्वरित खाली उतरवून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून तुळिंज पोलिसांनी शाळेतील तीन विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगप्रकरणी तक्रार दाखल केली असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.