शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्याचं नख लागल्याने रेबिज; सहा महिन्यांनंतर चिमुकलीचा मृत्यू, जखम भरत गेली पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:20 IST

या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : भटक्या श्वानाच्या नखाने एका चिमुरडीच्या हाताला जखम झाली. मात्र ती घाबरल्याने त्या जखमेवर इंजेक्शन देता आले नाही. नंतर हळूहळू ती जखम भरत गेल्याने त्याकडे कुटुंबीयांचेही दुर्लक्ष झाले. मात्र याच दरम्यान तिला रेबिजची लागण झाली आणि साधारण सहा महिन्यांनंतर सोमवारी त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

कशिश सहानी असे या मुलीचे नाव असून, ती नालासोपारा पश्चिमेतील सुबोध सागर इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ती मदर मेरी शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखाने तिच्या हाताला जखम झाली. दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी नेले होते, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत.

जखम लवकर भरल्याने पुढे त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती खालावली. अन्न-पाणी घेणे बंद झाले, डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू लागला. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविले; पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही तिचे प्राण वाचू शकले नाही. वैद्यकीय अहवालात रेबिज संसर्गाने मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

परिसरातील नागरिकांची तपासणी; पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क 

या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत प्रशासनाकडे गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आगामी मनपा सभेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवत संबंधित मुलीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक

श्वान किंवा मांजर चावणे अथवा नख लागणे ही बाब अजिबात दुर्लक्षित करू नये. त्वरित उपचार घेणे अत्यावश्यक आहे. 

विशेषतः लहान मुलांना इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे ते अनेकदा अशा गोष्टी लपवतात. 

अशावेळी पालकांनी मुलांशी विश्वासाने संवाद साधून त्यांना योग्यवेळी उपचार मिळतील, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहनही मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rabies from stray dog scratch: Girl dies months later.

Web Summary : A girl in Nalasopara died six months after a stray dog scratch. Ignored due to the wound healing, she contracted rabies. Urgent treatment is crucial for any animal bite or scratch; parents should ensure timely care.
टॅग्स :nalasopara-acनालासोपाराdogकुत्रा