The question of the decomposition of sanitary napkins will be erased; Vasai-Virar Municipal Corporation | सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनाचा प्रश्न मिटणार; वसई-विरार महापालिकेचा उपक्रम
सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनाचा प्रश्न मिटणार; वसई-विरार महापालिकेचा उपक्रम

विरार : राज्यातील विविध महापालिकांसमोर सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न असताना, वसई-विरार महापालिकेने सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनासाठी प्रायोगिक तत्त्वावर यंत्र बसवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे शहरातील कचºयातून दररोज निघणाºया सॅनिटरी नॅपकिनच्या विघटनाचा प्रश्न मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेसमोर सध्या कचरा व्यवस्थापनचा मोठा जटील प्रश्न आहे. त्यातच आता सॅनिटरी नॅपकिनची भर पडली आहे. दर दिवशी कचºयात मोठ्या प्रमाणात हे नॅपकिन सापडतात. अनेकदा हे नॅपकिन कचºयात टाकले जातात. त्यामुळे रोगराई पसरणे, जंतू संसर्गाचा धोका उद्भवण्याची भीती असते. तर काही वेळा हे नॅपकिन शौचकुपात टाकल्याने मलवाहिन्या तुंबणे, मलकुंड भरून वाहणे अशा अनेक समस्याही निर्माण होतात. त्यामुळे पालिकेसमोर सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनत होता.

वसई-विरार पालिकेने सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट करण्यावर उपाय शोधला असून एका इंजिनीअरिंग कंपनीकडून पर्यावरणपूरक यंत्र तयार करून घेतले आहे. सॅनिटरी पॅड डिस्पोजल असे या यंत्राचे नाव आहे. साधारणत: २० ते २५ किलो वजनाची ही मशीन दीड ते दोन फूट उंच आहे. या मशीनमध्ये एक हिटिंग कॉईल आहे ज्याच्या सहाय्याने सॅनिटरी नॅपिकन जाळले जातात. त

सेच यामध्ये हवा जाण्यासाठी एक पंखा बसवला असल्याने त्यातून कार्बन मोनॉक्साइडची निर्मिती होत नाही. एकावेळी ३ सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची या मशीनची क्षमता आहे. यातून केवळ एक ग्राम राख तयार होते. हे स्वयंचलित यंत्र असल्याने आॅपरेटरची गरज नाही. तसेच हे मशीन काम झाल्यावर बंद पडते.

महापालिकेतर्फे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शौचालय अथवा पालिका रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर एक यंत्र बसवण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर संपूर्ण शहरात हे यंत्र बसविले जाणार असल्याची माहिती वसई-विरार महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दिली आहे.

सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे यंत्र बसविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर निविदा मागवून संपूर्ण शहरात हे यंत्र बसविण्यात येणार आहे.
- बळीराम पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

Web Title: The question of the decomposition of sanitary napkins will be erased; Vasai-Virar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.