शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तंटामुक्त पुरस्काराच्या ४७ लाखांचा हिशेब द्या! गाव समित्या उरल्या नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:12 IST

  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता.

मोखाडा -  महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार योजनेच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यातील शिवली १ लाख, नाशेरा १ लाख, उधळे २ लाख, गोमघर वाशिंद २ लाख, करोळ पाचघर २ लाख, सातूर्ली ३ लाख, हिरवे पिंपळ पाडा ३ लाख, आडोशी ३ लाख, कारेगाव ३ लाख, सायदे ३ लाख, सूर्यमाळ ३ लाख, साखरी ३ लाख, पोशेरा ३ लाख, खोच ४ लाख, मोरहंडा ५ लाख, दांडवळ - नीळमाती २ लाख, कुर्लोद १ लाख अशा १७ ग्रामपंचायतीना वर्ष २०१३-१४ मध्ये ४७ लाखाचा निधी उपलब्ध झाला होता. परंतु एवढा मोठा भरीव निधी उपलब्ध होऊन देखील या निधीला भ्रष्टचाराची कीड लागल्याने तंटामुक्त गाव समित्या नावालाच उरल्या असून मुख्य उदेशालाच हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे .वर्ष २००७ मध्ये गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारने गावातील फौजदारी, महसूल, दिवाणी व इतर भांडणे वादवाद गावातच मिटवणे हा उद्देश समोर ठेऊन तंटामुक्ती पुरस्कार योजना कार्यान्वित केली होती. परंतु संबधितानी आपलेच खिसे भरल्याने ही योजना येथे बारगळली आहे.सुरवातीला पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना एक लाखाचे बक्षीस दिले जात होते. २००३ मध्ये अनुदानात वाढ करून तो आकडा पाच लाख रु पये करण्यात आला. ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करून गाव तंटामुक्त झाल्याचा शांतता अहवाल पाठवल्या नंतर निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी देण्यात आला. याच धर्तीवर मोखाडा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींना ४७ लाख रु पयांचा निधी देण्यात आला व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या परिशिष्ट ७ पत्रका नुसार खर्चचा विनियोग करणे बंधनकारक होत. यातील १५ टक्के रक्कम ही योजनेच्या प्रचारासाठी खर्च करायची होती. परंतु यावर हा खर्च झालाच नाही. तसेच, बांधकाम दुरूस्तीवर हा खर्च करणे अपेक्षित नसताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक यांनी गाव समितीला विश्वासात न घेता ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेची केलेली कामे याच निधीतून केल्याचे दाखविली आहे.तहसीलदार, गटविकास अधिकारी अध्यक्ष असलेल्या तालुका कमिटीकडे केलेल्या कामाचा लेखा जोखा हा तालुका कमिटीचे सचिव (ठाणे अंमलदार) यांचे कडे पाठवायचा आहे परंतु असे असताना किती ग्रामपंचायतीने हा अहवाल पाठवला त्याची चौकशी झाल्यास घोटाळा बाहेर येऊ शकतो, दरम्यान तहसीलदार पी. जी. कोरडे यांनी २०१२-१३ तील रिपोर्टची अपनास माहिती नसल्याचे लोकमतला सागितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार