शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

मीरा-भार्इंदरमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे गाजर

By admin | Published: May 13, 2017 12:35 AM

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील झोपड्यांच्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने केलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील झोपड्यांच्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने केलेल्या सर्र्वेक्षणानुसार शहरातील ४६ पैकी ३ झोपडपट्ट्यांचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करून त्यांना पकक्या घरांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लाभार्थी झोपडपट्ट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून येत्या महासभेत मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. तत्कालीन राजीव आवास योजनेंतर्गत मीरा-भार्इंदरमधील झोपड्यांचे अनेक वर्षांपासून सर्र्वेक्षण सुरू केले होते. परंतु, त्या योजनेचे फलित अद्याप प्राप्त झाले नसले, तरी युती सरकारच्या पंतप्रधान आवास योजना मात्र प्रभावशाली असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. त्यानुसार, झोपडपट्ट्यांतून राजकीय श्रेयाची बॅनरबाजी होत आहे. या नवीन योजनेत पक्की घरे मिळण्याच्या आशेपायी झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी पायपीट केली. योजना लागू होताच पालिकेनेही तात्पुरते शहरातील ४६ झोपडपट्ट्यांचे सर्र्वेक्षण सुरू केले. शहरातील सुमारे २८३ एकर जागेवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांतील झोपड्यांची एकूण संख्या २७ हजार ५०७ इतकी आहे. त्यापैकी केवळ १७ हजार २६२ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. उर्वरित झोपड्या सर्वेक्षणापासून वंचित ठेवल्या आहेत. यातील बहुतांश झोपडपट्टी केंद्राच्या मीठ विभागाच्या, तर काही राज्य सरकारच्या व पालिकेच्या नागरी सुविधा भूखंडांवर वसल्या आहेत. पालिकेने एकूण ४६ झोपडपट्ट्यांपैकी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील लालबहादूर शास्त्रीनगर, भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व पूर्वेकडील आदर्श इंदिरानगर झोपडपट्ट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निवड केली आहे.या झोपडपट्ट्याही सरकारी व पालिकेच्या भूखंडावर वसल्या आहेत. त्यातील आंबेडकरनगर व इंदिरानगर या झोपडपट्ट्या सीआरझेडबाधित आहेत. त्यामुळे त्यांचा विकास होणे अवघड आहे.