डहाणूत भाजपाची विजयी रॅली, स्मृती इराणी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:29 AM2017-12-26T06:29:39+5:302017-12-26T06:29:41+5:30

भाजपाच्या विजयी १५ नगरसेवकांची मिरवणूक नाताळच्या मुहूर्तावर तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

The presence of all the corporators along with the victory rally of Dahanu, Smriti Irani | डहाणूत भाजपाची विजयी रॅली, स्मृती इराणी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती

डहाणूत भाजपाची विजयी रॅली, स्मृती इराणी यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती

Next

डहाणू : या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत राजपुत यांच्यासह भाजपाच्या विजयी १५ नगरसेवकांची मिरवणूक नाताळच्या मुहूर्तावर तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. त्यांच्या हस्ते केक कापून विजयी मिरवणुकीचा शुभारंभ येथील भाजपा कार्यालयापासून करण्यात आला.
हजारो नागरिकांनी दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहनांद्वारे सहभाग घेतला. मिरवणुकीच्या अग्रस्थानी घोडेस्वार होते. मिरवणूक निघण्याआधी भाजपा कार्यालयाच्या आवारात डी.जे.च्या तालावर गुजराती नृत्ये सादर करण्यात आली. या मिरवणुकीत खा. चिंतामण वनगा, आ. पास्कल धनारे, ना. विष्णू सावरा तसेच हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: The presence of all the corporators along with the victory rally of Dahanu, Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.