शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

काही वर्षांपासून किनाऱ्याची धूप : प्रकल्पांमुळे निसर्गावर घातला जाणार घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:42 PM

पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो.

डहाणू/बोर्डी : पर्यावरण हाच डहाणूतील पर्यटनाचा मुख्य घटक असल्याने पर्यटन हंगामाव्यतीरिक्तही येथे वर्षभर पर्यटकांचा राबता दिसून येतो. काही वर्षांपासून किनाºयाची धूप, बेकायदा बांधकाम यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून हा प्रश्न संवेदनशीलपणे न हाताळल्यास त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.उत्तर कोकणातील डहाणू हा तालुका राज्याच्या सागरी पर्यटनाचे कोंदण म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळू, कधी दगडी तर कधी अथांग किनारा, सुरू, कांदळवनाची हिरवी भिंत, चिकू आणि माडांची झालर यामुळे याच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. तर समुद्रातील मासे आणि मोसमी फळांची मेजवानी मिळत असल्याने विविध पर्यटन हंगामात दरवर्षी पर्यटक दाखल होतात.कृषी उत्पादने आणि फळ प्रक्रिया उद्योगासह बागायतीच्या जोडीला इको टूरिझमची जोड देऊन हॉटेलिंग व्यवसायाची पाळेमुळे पसरू लागली आहेत.तरूण पिढी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरली आहेत. पूर्वी जवळच्या मुंबई आणि गुजरातच्या शहरातून येणारे पर्यटक आता देश-विदेशातून येऊ लागले आहेत. वाळूशिल्प, तारपा, घोरनृत्य, दशावतार, वेगवेगळ्या यात्रा आणि चिकू महोत्सवासारख्या इव्हेंटमधून पर्यटन व्यवसायाला झळाळीच आली आहे.असे असताना मोठ्या प्रमाणात समुद्रातून होणा-या रेती चोरीमुळे किनाºयाची हानी आणि धूप होऊन दरवर्षी शेकडो झाडे जमीनदोस्त होतात. समुद्रातील तेल गळतीने तवंग पसरून विद्रुपीकरण होते. कायदा पायदळी तुडवून भराव टाकल्याने पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकारण हटविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पर्यावरणाचा बळी घेतला जात असल्याची भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येऊ घातलेले विविध प्रकल्प आणि उद्योगधार्जिण्या धोरणाचा हट्ट काही मोजक्या घटकांनी धरल्याने समृद्ध असलेले पर्यावरण टिकवायचे कसे? जर तसे झाले तर पर्यटन व्यवसायाला परिणाम भोगावे लागतील.डहाणू समुद्र किना-यावर जी सुरूची झाडे आहेत ती चोरट्या वाळू उपशामुळे भरतीच्या लाटेत उन्मळून पडू लागली आहेत. प्रशासकीय यंत्रणेचे असलेले अभय व अनास्थेमुळे किनारे बकाल होऊ लागले आहेत. त्यासाठी धूप प्रतिबंधक बंधारे असणे आवश्यक आहे. डहाणू तालुका पर्यावरण दक्षता प्राधिकरणामुळे अंकुश राहिला आहे. हे प्राधिकरण हटविण्यासाठी राजकीय खेळी खेळली जात आहे. यामुळे पुढे डहाणूतील स्थानिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे.- प्रवीण ना. दवणे, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :pollutionप्रदूषणVasai Virarवसई विरार