लोक मरताहेत, तरीही नियम पायदळी, जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही बाजारांत गर्दी : ग्रामीण भागांत अद्याप बेफिकिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:50 AM2021-05-12T09:50:35+5:302021-05-12T09:54:13+5:30

जिल्ह्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून, १५ मेपर्यंत मनाई आदेश जाहीर करण्यात आलेला आहे.

People are dying, rules are still in place, markets are crowded despite lockdown in the district: | लोक मरताहेत, तरीही नियम पायदळी, जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही बाजारांत गर्दी : ग्रामीण भागांत अद्याप बेफिकिरी

लोक मरताहेत, तरीही नियम पायदळी, जिल्ह्यात लाॅकडाऊन असतानाही बाजारांत गर्दी : ग्रामीण भागांत अद्याप बेफिकिरी

Next

पालघर : लसीकरण मोहिमेला नावे ठेवणारे अनेक लोक आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, त्याची झळ आपल्याला लागू नये, म्हणून लसीकरणाच्या रांगेत मोठी गर्दी करू लागले आहेत, तर दुसरीकडे कोरोनामुळे लोक मरत असतानाही अनेक जण बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९९ हजार १३५ झाली असून, १ हजार ७८० बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या १५ हजार ६१७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने, त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून, १५ मेपर्यंत मनाई आदेश जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत कडक अंमलबजावणी सुरू आहे, तरीही काही लोक मेडिकल, हॉस्पिटल, अत्यावश्यक बाबींच्या नावावर बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत असला, तरी ग्रामीण भागाच्या बाजारपेठा, दुकाने सुरू असल्याने महिलांची गर्दी काही भागांत होत आहे. पोलिसांनी सकाळी ७ ते ११ अशी बाजारपेठा आणि दुकाने सुरू ठेवण्याचे जाहीर केले असले, तरी काही भागात संध्याकाळीही बाजारात गर्दी केली जात असल्याचे दिसून येत आहे.

अनेक गावांत कोरोनासदृश आजाराने अनेकांचे मृत्यू होत असले, तरी अँटिजन टेस्टसाठी मात्र नागरिक पुढे येत नसल्याने, खासगी डॉक्टरांकडून आणलेल्या औषधांवर सारी भिस्त ठेवून घरातच उपचार घेत आहेत. अंगावर ताप काढून कोरोनावरील योग्य उपचार घरी होत नसल्याने, शरीरातील ऑक्सिजन पातळी खाली आल्यावर उपचारासाठी धावाधाव केली जात असल्याने, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची कमतरता जिल्ह्यात भासू लागली आहे. 

कारवाईची आवश्यकता 
- सध्या २ लाख ८५ हजार ५६४ नागरिकांचे लसीकरण झाले असून, लसीकरण केंद्रावरच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 
- लॉकडाऊनही नको आणि कोरोना वाढायलाही नको, अशी भूमिका काही मंडळी घेत असून रोजगार बंद पडल्याने प्रशासनावर टीकाही करीत आहेत. तर बाजारपेठेत, दुकानात गर्दी करणारे, तसेच कोरोनाचा आजार लपवणाऱ्यांच्या संपर्कातील लोक बाहेर बिनधास्त फिरत आहेत. अशा बेपर्वा सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता व्यक्त होत आहे.
 

Web Title: People are dying, rules are still in place, markets are crowded despite lockdown in the district:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app