शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

चिंतामण वनगा यांना भावपूर्ण निरोप, मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडून श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:42 AM

मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

पालघर/बोर्डी - मंगळवारी दिल्लीत निधन झालेल्या भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे पार्थिव बुधवारी सकाळी १०च्या सुमारास तलासरीतील कवाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्या वेळी आदिवासी बांधवांना व कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.अंत्यविधीसाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे यांसह वरिष्ठ भाजपा नेत्यांनी वनगा परिवाराचे सांत्वन करून वनगा यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतरदुपारी ३च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आदिवासींचा चिंतामणी हरपलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वादोनच्या सुमारास कवाडा वनगापाडा येथील वनगा यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून वनगा यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या त्यांच्याच शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव, भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. ३ वाजता आदिवासी परंपरा आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.तत्पूर्वी बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून त्यांचे पार्थिव अ‍ॅम्ब्युलन्सने तलासरी येथे आणण्यात आले. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्रात आणि भाजपा कार्यालयाच्या आवारात ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुष्परथातून ते कवाडा येथील निवासस्थानाकडे नेण्यात आले. या वेळी वनगा कुटुंबीयांसमवेत समाजबांधवांनाही दु:ख आवरणे अवघड झाले होते.हजारो समाजबांधव, भाजपा कार्यकर्ते यांनी वनगांच्या निवासस्थानासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात वनगा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, मनीषा चौधरी, पक्ष सचिव ओमप्रकाश शर्मा आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.मंत्रिमंडळ बैठकीत निधनाची बातमी कळाल्यावर शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. त्यांचे नेतृत्व संघर्षातून तयार झालेले होते तसेच त्यांच्यावर राष्ट्रीय विचारांचा पगडा होता. त्यांच्या जाण्याने खºया अर्थाने आदिवासींचा नेता हरपला आहे. मी त्यांचे विधानसभेतील काम खूप जवळून पाहिले आहे. ते तळागाळातल्यांचे प्रश्न तर मांडत होतेच; पण ते सोडवताना मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांची अपुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.- देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री

टॅग्स :Chintaman Wangaचिंतामण वनगाBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र