शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

वसईत अ‍ॅम्ब्युलन्सच्या जागी पार्कींग, आवाज उठविणाºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:44 AM

नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.

शशी करपेवसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे. शशी करपेवसई : नेहमी गर्दीने वहात असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशनबाहेर अ‍ॅम्ब्युलन्ससाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीरपणे मोटार सायकली उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे अ‍ॅम्ब्युलन्सला जागाच शिल्लक नसते.वसई रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला अ‍ॅम्ब्युलन्ससाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, याठिकाणी मोटार सायकली उभ्या करून ठेवल्या जात असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स उभी करण्यासाठी जागा राहिलेली नाही. त्यातच रिक्शा स्टँडमुळे उर्वरित जागा व्यापली गेली आहे. परिणामी अ‍ॅम्ब्युलन्स ठेवणे मुश्कील होऊन बसले आहे.वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात पार्कींगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातून रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांनी रेल्वे परिसरात बेकायदा पार्कींगला मोकळे रान करून दिले आहे. या चारही रेल्वे स्टेशन परिसरात तरुणांच्या टोळक्यांनी बेकायदा पार्कींग सुरु केली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर पडण्यासाठी असलेला मार्ग व पादचारी पूलाच्या तोंडावरच मोटार सायकली उभ्या केलेल्या असतात. या मोटार सायकलस्वारांकडून दररोज वसूल करण्यासाठी गुंडप्रवृत्तींच्या मुलांना ठेवण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने पार्कींगवर आवाज उठवला की ही टोळी त्याला मारहाण करीत असते. रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन मास्तरांना दररोज आर्थिक मोबदला मिळत असल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता बेकायदा पार्कींगने स्टेशन परिसर व्यापून गेले आहेत. रेल्वे स्टेशनवर एल्फिस्टन रेल्वे स्टेशनसारखी एखादी घटना घडल्यास स्टेशनबाहेर पडतांना प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करते आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगVasai Virarवसई विरार