Panjoo tragedy, despite being chosen as a tourist destination | पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच
पर्यटनस्थळ म्हणून निवड होऊनही पाणजूची शोकांतिकाच

आशिष राणे


वसई : पाणजू ग्रामस्थांचा खरोखरच विकास करावयाचा असेल तर सरकारची इच्छाशक्ती हवी, सोबत या शहरी भागाला जोडण्यासाठी मुख्य रस्ता अथवा पादचारी पूल नाही ही शोकांतिका असल्याचे ग्रामस्थ सांगतात.


इंटरनेटने आज जग जवळ आले असले तरीही दुर्गम भाग असलेल्या जंगलपट्टीत सुद्धा रस्ते तयार होत असून नायगांव व भार्इंदर दरम्यान असलेल्या या पाणजू बेटावर राहणाऱ्या रहिवाशांच्या नशिबी मात्र आयुष्यभर बोटीने प्रवास करण्याचे कुठपर्यंत लिहिले आहे हे मात्र पाणजू वासीयांचे सध्या तरी दुर्दैव असल्याचे खाजगीत म्हणावे लागेल.


गावात ग्रामपंचातीचे उत्पन्न वाढावे म्हणून पालघर जिल्हा परिषेदेकडे २५ लाखाचे कर्ज फेरी बोटींच्या धंद्यासाठी मागितले आहे, ते मिळाल्यास ग्रामपंचायतीची स्वत:ची बोट होऊन ती वापरता येईल व त्यातून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीस लागेल. आम्ही नोव्हेंबरमध्ये गावाला नीती आयोगानं पर्यटन स्थळा म्हणून विकसित करण्यासाठी सरकार म्हणून जिल्हाधिकारी व केंद्रीय पथकाने भेट दिली होती तसे झाल्यास गावात प्रेक्षणीय स्थळं, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आदी सोयीसुविधा होतील व याचा फायदा गावातील भूमिपुत्र व ग्रामपंचायतीला नक्कीच होईल. केवळ हक्काचा रस्ता व पादचारी पूल झाल्यास आम्ही खºया अर्थी शहरी भागाला जोडले जाऊ हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे पाणजू चे सरपंच आशिष भोईर यांनी सांगितले.

रखडलेल्या भार्इंदर-वसई खाडीला मुहूर्त कधी?
वसई विरार प्रदेशाच्या विकासात पाणजू बेटाला ५ किमी असा ३०.६ रु ंदीचा सहा पदरी समांतर रस्ता मिळणार आहे, या पुलावर एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरण रु पये १०८१ कोटी ६० लक्ष खर्च करणार आहे. त्यावेळी या पुलाच्या बांधकामात खारफुटी व मिठागर यांच्या सह पाणजूवासीयांचा अडथळा होता, मात्र, आता तो दूर झाला आहे. आता हा पूल पाणजूला जोडला जाणार आहे. त्यातच या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळाला आहे.

बेट समग्र विकास अंतर्गत निधी मिळणार!
च्पाणजू बेटाच्या विकासासाठीचा आरखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर व कोकण विभागीय आयुक्त यांनी पाणजू गावाला गतवर्षी नोव्हेंबर मध्ये भेट देऊन पाहणी केली होती.
च्बेट समग्र विकास म्हणजेच (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट आॅफ आयलँडस प्रोग्राम) या कार्यक्र मांतर्गत या बेटाचा पर्यटन विकास करण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेमधून निधी उपलब्ध केला जाणार आहे.

कसा होणार विकास
पर्यटनस्थळ नीती आयोगाने देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आणि देशात एकूण १ हजार३८२ बेटे आहेत. त्यापैकी अगदी पहिल्याच टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याने या २६ बेटांच्या यादीत पालघर जिल्हा आणि त्यात आपला वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आलेली आहे.


Web Title: Panjoo tragedy, despite being chosen as a tourist destination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.