शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

‘पक्षांतर’ करणारा पालघर, अपवाद फक्त काँग्रेस आणि शिंगडा यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 01:17 IST

जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून येथून निवडणूक जिंकली होती आणि काँग्रेसचा झेंडा तिथे फडकविला होता.

पालघर : अगदी प्रारंभापासून डहाणू हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जव्हारचे राजे यशवंतराव मुकणे यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून येथून निवडणूक जिंकली होती आणि काँग्रेसचा झेंडा तिथे फडकविला होता. त्यानंतर दामोदर उर्फ दामू शिंगडा यांनी तो जवळपास सहा निवडणूकांमध्ये विजय मिळवून तो बालेकिल्ला अबाधित राखला परंतु जेव्हा भाजपा स्थापन झाला त्यावेळी चिंतामण वनगा यांनी तो काँग्रेसकडून हिरावून घेतला. पुढे बळीराम जाधवांच्या रूपाने तो विरोधकांकडेच राहिला. कधी तो शंकर सखारम नम यांनी अल्प काळासाठी काँग्रेसकडे नेला तर वनगा आणि गावित यांनी तो पुन्हा भाजपाकडे खेचून नेला.या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा अथवा सेना-भाजपा युती यांच्यातच खरी लढत होत राहिली. बविआने जाधवांच्या रूपाने काहीसे आव्हान उभे केले परंतु ते अल्पजीवी ठरले. २००९ पर्यंत शिंगडा यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखला परंतु २००९ च्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी त्याला सुरूंग लावला व हा मतदारसंघ आघाडीकडे गेला.शिंगडा हे मुळचे डहाणूचे, डहाणूचे दबंग राजकीय नेते शशिकांत बारी यांच्या पाठिंब्यावर राजकारणात आले आणि खासदार झाले. हा मतदारसंघ अनुसुचित जमातींसाठी राखीव असल्याने व शिंगडा हे त्यातल्या त्यात उजळ प्रतिमा असलेले असल्याने त्यांना सतत उमेदवारी मीळत गेली व त्यांनी सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या आणि चौदाव्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळविला. विशेष म्हणजे २००९ मधील लोकसभा निवडणूकीत शिंगडा यांचा पराभव बळीराम जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून केला होता. तर शिंगडा यांना प्रधिर्घ काळा खासदारकी मिळाली तरी त्यांना त्याचा योग्या तो वापर करता आला नाही. नंदुबारच्या माणिकराव होडल्या गावित यांनी जशी केंद्रीय गृहराज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली तशी भरारी शिंगडा यांना घेता आली नाही. ते फक्त खासदारच राहिले. बाकीचे सोडा त्यांना आपला पुत्र सचिन याला आपला उत्तराधिकारी म्हणून देखील आणता आले नाही.२००९ मध्ये पालघर हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला कारण पालघर हा जिल्हा नव्याने निर्माण करण्यात आला होता. त्यामुळे येथील सर्व राजकारण बदलून गेले. त्यानंतर तो बविआचे बळीराम जाधव आणि भाजपाचे वनगा आणि गावित यांनी आपापल्या पक्षाकडे आळीपाळीने राखून ठेवला. वनगा हे आदिवासी समाजातील पहिले वकील होते. त्यांची प्रतिमा समाजात खूप उजळ होती त्याचा फायदा त्यांना मिळला. तर बळीराम जाधव हे बविआसारख्या अत्यंत छोटया व जिल्हास्तरीय पक्षाचे खासदार ठरले होते. शंकर सखाराम नम यांना काँग्रेसने डहाणू मधून एकदा उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांनीही हा गड काँगे्रससाठी अबाधीत ठेवला होता.हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे म्हणजे जरी तो अनुसुचित जमातींसाठी राखीव असला तरी त्यावर एकाच समाजाचे वर्चस्व नाही थोडयाफार प्रमाणात सहा सात समाजाचे मतदार असल्याने त्याला एक गठ्ठा व्होट बँकेचे स्वरूप आलेले नाही. जाणकारांच्या मतानुसार या मतदासंघात आदिवासींची संख्या मोठी असली तरी त्यात आगरी, कुणबी, यांचेही प्रमाण बऱ्यापैकी आहे, ख्रिश्चनांचीही संख्या मोठया प्रमाणात आहे. त्यामुळेच त्याचे हे विविधांगी स्वरूप कायम राहिले आहे. या संख्येमध्ये आदिवासी मतदारांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यांची मतेही एक गठ्ठा स्वरूपात पडत नाहीत, त्यामुळे येथील मतदार हे जातीपेक्षा उमेदवाराची प्रतिमा आणि पक्षाचा मतदारांवर असलेला प्रभाव तसेच अस्तित्वात असलेली सुप्त वा गुप्त लाट याच्या आधारे होत असते.या मतदारसंघातील खासदाराला अजुनपर्यंत एकदाही मंत्रीपद अथवा तत्सम मोठे पद मिळालेले नाही. आताही या मतदारसंघात महायुतीचे राजेंद्र गावित विरूध्द बविआचे बळीराम जाधव अशीच लढत आहे. आतापर्यंतच्या खासदारांपैकी शंकर नम, राजेंद्र गावित, दामू शिंगडा, हे तीन खासदार राज्याच्या राजकारणातून खासदारकी पर्यंत पोहचले होते. तीन पक्षांतर करून निवडणूकीत उतरलेले गावित हे एकमेव उमेदवार आहेत त्यामुळे आता मतदार कोणती भूमिका घेतात हे पाहणे रंजक ठरेल.आपर्यंत या मतदारसंघाने प्रारंभाीच्या ३ दशकात काँग्रेस आणि शिंगडा यांना वन्स्मोअर दिला परंतु यावेळी एक पक्ष तर पुढच्या वेळी दुसरा पक्ष यावेळी एक तर पुढच्यावेळी दुसरा उमेदवार असे पक्षांतर या मतदारसंघाने केले आहे. जव्हारचे संस्थानिक यशवंतराव मुकणे यांच्यापासून ते राजेंद्र गावित अशा सगळयांना त्याने संधी दिली.>तीन दशकांतील बदलते समीकरण व राजकारणडहाणू म्हणजे काँग्रसे आणि काँग्रेस म्हणजे शिंगडा असेच समीकरण जवळपास तीन दशके कायम राहिले होते. परंतु व्यक्तीगत संबंध आणि मजबुत पक्षबांधणी याच्या जोरावर भाजपाच्या चिंतामण वनगा यांनी मजल मारली. वनगा यांनी एका निवडणुकीत विजय मिळवून हा मतदारसंघ भाजपाचा गड ठरू शकतो असा विश्वास निर्माण केला. २००९ मध्ये सर्वच मतदार संघांची पुनर्रचना झाली त्यात डहाणू ऐवजी पालघर हा मतदारसंघ निर्माण झाला. पालघर मतदार संघ अस्तित्वात आल्यानंतर सर्वच राजकारण बदलले. त्यानंतर तो बविआचे बळीराम जाधव आणि भाजपाचे वनगा आणि गावित यांनी आपापल्या पक्षाकडे आळीपाळीने खेचून आणला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर